आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात यंदा राहणार 16 हजार 480 जागा रिक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दहावीचा निकाल नुकताच लागला. जिल्ह्यातील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयांतील एकूण प्रवेश संख्येपेक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यंदा कमी असल्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी पालकांना धावपळ करावी लागणार नाही. उलट विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे रिक्त राहणार्‍या 16,480 जागांसाठी महाविद्यालयांनाच धावाधाव करावी लागणार आहे. सध्याच्या प्रवेश नोंदणीनुसार विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातून यंदा 41 हजार 220 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात पारंपरिक अभ्यासक्रमांची 616 महाविद्यालये आहेत, तर दोन तंत्रशिक्षण (आयटीआय) महाविद्यालये आहेत. पॉलिटेक्निक डिप्लोमा अभ्यासक्रमाची 15 महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांची प्रवेश क्षमता 57 हजार 700 आहे. मात्र, यंदा 41 हजार 220 विद्यार्थी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे तब्बल 16 हजार 480 जागा रिक्त राहणार आहेत.

विज्ञान शाखेला पसंती
सध्या सर्वाधिक विद्यार्थ्यांची पसंती विज्ञान शाखेला आहे. वाणिज्य शाखेतही विद्यार्थी संख्या वाढत आहे, परंतु कला शाखेला मात्र थंड प्रतिसाद मिळतो आहे. मागील वर्षीदेखील हीच परिस्थिती होती. त्यामुळे यंदादेखील काही जागा रिक्त राहू शकतात. - अशोक तेजनकर, उपप्राचार्य, देवगिरी महाविद्यालय.

कला शाखेतही संधी
कला शाखेला प्रतिसाद कमी असला तरी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतील यशामुळे इकडे वळत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षेत्रांची गोडी निर्माण व्हावी, यासाठी आम्ही माहिती पुस्तिकेतच शाखा आणि त्यातील रोजगाराच्या संधींविषयी माहिती दिली आहे.
- मकरंद पैठणकर, उपप्राचार्य, सरस्वती भुवन महाविद्यालय

अशी आहे शहरातील प्रमुख महाविद्यालयांची प्रवेश क्षमता

देवगिरी महाविद्यालय
कला 360
वाणिज्य 720
विज्ञान 1800
एमसीव्हीसी 240 याव्यतिरिक्त ट्रॅव्हल्स टुरिझम

शिवछत्रपती महाविद्यालय
कला 240
वाणिज्य 240
विज्ञान 840

सरस्वती भुवन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय
कला शाखा 120
वाणिज्य शाखा 600
विज्ञान शाखा 1 हजार 80
व्होकेशनल 75

विवेकानंद महाविद्यालय
कला 600
वाणिज्य 240
विज्ञान 840
एमसीव्हीसी 20
अकाउंटन्सी 20, इलेक्ट्रॉनिक्स 20, कॉम्प्युटर सायन्स 20

मौलाना आझाद
कला 240
वाणिज्य 240
विज्ञान 840

औरंगाबाद जिल्ह्याची प्रवेश क्षमता
> कला शाखा विद्यार्थी क्षमता 41 हजार 920 व महाविद्यालये 361
> विज्ञान शाखा विद्यार्थी क्षमता 11 हजार 220 व महाविद्यालये 185
> वाणिज्य शाखा विद्यार्थी क्षमता 3 हजार 680 व महाविद्यालये 57

अशी असेल प्रवेश प्रक्रिया
सध्या महाविद्यालयांमध्ये फक्त नाव नोंदणी सुरू आहे. प्रवेश प्रक्रिया 17 जूनपासून सुरू होईल, कारण 15 जून रोजी विद्यार्थ्यांना बोर्डातून गुणपत्रिका मिळतील. त्यानंतर 17 जूनपर्यंत टी.सी.मिळेल. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल. 18 व 19 जून रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. ही प्रवेश प्रक्रिया जूनअखेरपर्यंत सुरू राहील.