आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, पहिली गुणवत्ता यादी 28 जूनला जाहीर होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रथमच होत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत वारंवार माहिती देऊनही शाळा-कॉलेजांमध्ये होणारा गोंधळ कायम अाहे. विद्यार्थ्यांचा हा गोंधळ दूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने सोमवारी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. 

पुण्या-मुंबईच्या धर्तीवर यंदा औरंगाबाद शहरातही अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे हे पहिलेच वर्ष असल्याने अनेक अडचणी शिक्षण विभागाप्रमाणेच विद्यार्थी, शाळा-कॉलेजांसमोर असल्याचे चित्र दिसून आले आहे. आज शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर केले. यापूर्वीच जूनपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. आता या वेळापत्रकानुसार २७ जून पर्यंत विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भाग एक आणि भाग दोन भरून दाखल करायचा आहे. २७ जून रोजीच कोटा प्रवेशाचे अर्ज संकेतस्थळावर स्वीकारण्यात येतील. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर आहे.

२८ जून रोजी गुणवत्ता यादी कॉलेज कोड, शाखानिहाय रिक्त जागांसह जाहीर करण्यात येईल. २८ २९ जून रोजी कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज कोडनिहाय शुल्क घेऊन प्रवेश करून ती माहिती संकेतस्थळावर अपडेट करायची आहे. २९ जून रोजी पहिल्या फेरीनंतरच्या कोटा प्रवेशातील रिक्त जागा ऑनलाइन कॉलेजांनी सायंकाळी पर्यंत कळवायच्या आहेत. सायंकाळी वाजता प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ३० जून रोजी अर्जातील त्रुटी, हरकती मार्गदर्शन केंद्रांवर लेखी स्वरूपात स्वीकारल्या जातील. त्या अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३० जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. जुलैला रिक्त जागा कॉलेज लॉगइनमधून ऑनलाइन सरेंडर करता येतील. जुलै रोजी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. ते जुलै रोजी सायंकाळी पर्यंत केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील. जुलैला रिक्त जागांचा तपशील पहिल्या फेरीचे कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील. 

जुलैला भाग दोन अर्जांत पसंतीक्रम बदल असल्यास भरता येईल. १३ जुलैला प्रवेशाची दुसरी केंद्रीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. या यादीतील प्रवेश १४ जुलैपर्यंत करता येतील. १५ जुलैला रिक्त जागांचा तपशील दुसऱ्या फेरीचा कट ऑफ संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. १६ १६ जुलैला प्रवेश अर्ज भाग दोनमधील पसंतीक्रम बदलता येईल. १९ जुलैला तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. याचे प्रवेश १९, २० जुलै रोजी करावे लागतील. २१ जुलै रोजी तिसऱ्या फेरीतील कट ऑफ जाहीर होईल. २१, २२ जुलै रोजी तिसऱ्या फेरीसाठीचा पसंतीक्रम पर्यंत भरता येईल. २४ जुलै रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यातील विद्यार्थ्यांनी २४ २५ जुलै रोजी चौथ्या गुणवत्ता यादीतील प्रवेश करता येतील. २६ जुलैपासून अकरावीचे नियमित वर्ग सुरू होतील, असे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने कळवले आहे. 

मुख्याध्यापकांसाठी २३ जूनला कार्यशाळा 
अकरावीच्याऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मुख्याध्यापक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना माहिती देण्यासाठी २३ जून रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. देवगिरी महाविद्यालयात ११ वाजता ही कार्यशाळा होईल. यासाठी सर्व अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

प्रवेशासाठीचा निकष 
इनहाऊस कोटा - २० टक्के, अल्पसंख्याक कोटा ५० टक्के, व्यवस्थापन कोटा टक्के, तांत्रिक कोटा २५ टक्के (यात दहावी परीक्षेत व्यवसाय शिक्षण विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना बायफोकल किंवा एचएसव्हीसी) 
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...