आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12.84 Tmc Water To Jayakwadi Form Nagar And Nashik

दिलासा : मराठवाड्यासाठी 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी जायकवाडी धरणात अहमदनगर आणि नाशिक येथील चार धरणांमधून 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश आज, शनिवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाकडून देण्यात आले. पाटबंधारे विभाग आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी यांची सयुक्‍त बैठक आज पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्‍यामुळे आता 31 ऑक्‍टोबरपूर्वी हे पाणी जायकवाडी धरणात सोडण्‍यात येणार आहे. दुष्‍काळग्रस्‍त मराठवाड्याला या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्‍याची शक्‍यता आहे.
मुळा, प्रवरा, गंगापूर आणि गोदावरी-दारणा या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्‍यात येणार आहे. जायकवाडी जलाशयामध्‍ये सध्या केवळ 6 टक्के पाणीसाठा आहे. पहिल्या धोरणानुसार 15 ऑक्टोबरला मुळा धरण समूहात 49 टक्क्यांपेक्षा अधिक, प्रवरामध्ये 56 टक्के, गंगापूरमध्ये 61 टक्के, दारणामध्ये 64 टक्के, पालखेडमध्ये 73 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी असेल तर अधिकचा हिस्सा जायकवाडीत सोडावा, असे निर्देश आहेत. या निर्णयामुळे आता, नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील नेत्‍यांमध्‍ये जुंपण्‍याची शक्‍यता आहे.
असे सोडले जाईल पाणी
- नाशिक, नगरमधील मुळा धरणातून 1.74 टीएमसी
- प्रवरामधून 6.50 टीएमसी
- गंगापूर 1.36 टीएमसी
- दारणा धरणातून 3.24 टीएमसी

प्रकल्‍प व साठा
- जायकवाडी धरणावर नाशिक जिल्ह्यात 13 मोठे व 7 मध्यम प्रकल्‍प.
- नगर जिल्ह्यात 3 मोठे व 3 मध्यम प्रकल्प आहेत.
- नाशिक जिल्ह्यात 13 मोठ्या प्रकल्पात 46.89 टक्के, मध्यम प्रकल्पात 48.90 टक्के साठा.
-नगर जिल्ह्यातील 3 मोठ्या प्रकल्पात 57.52. टक्के व मध्यम प्रकल्पात 61.76 टक्के साठा.