आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: यंदा चक्क 12 दिवस बाप्पांचा मुक्काम, 100 वर्षांत चाैथा योग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दरवर्षी गणपती बाप्पा दहा किंवा अकरा दिवसांसाठी येतात. यंदा बाप्पा दहा-अकरा नव्हे तर चक्क बारा दिवस मुक्कामासाठी येणार आहेत. यंदा दशमी या तिथीत वृद्धी (वाढ) झाल्याने हा योग तब्बल ३६ वर्षांनंतर आला आहे. असा १२ दिवसांचा गणेशोत्सव १९८१ मध्ये आला होता. बाप्पांचा मुक्काम वाढण्यामागे आध्यात्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण आहे. चंद्र-सूर्याच्या परिवलनाचा हा परिणाम आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

यंदा गणेशाचे आगमन २५ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला होत आहे. यंदा ३१ ऑगस्ट सप्टेंबर असे दोन दिवस दशमी ही तिथी आहे. रोजी एकादशी, रोजी द्वादशी, रोजी त्रयोदशी आणि सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे गणेशाेत्सव बारा दिवसांचा आला आहे. शास्त्रकारांच्या मते चंद्र-सूर्याच्या गतीवरून पंचांगाचे गणित केले जाते. त्या गणितात यंदा दशमी तिथी दोन दिवस आल्याने गणेशाचा मुक्काम वाढला आहे. तिथीमध्ये कधी घट तर कधी वृद्धी होते. दरवर्षी दहा दिवसांचा गणेशोत्सव असतो. काही वेळा अकरा दिवसांचा असतो. मात्र, बारा दिवसांचा योग गेल्या शंभर वर्षांत चाैथ्यांदा आल्याचे शास्त्रकारांनी सांगितले. 

आध्यात्मिक महत्त्व नाही... 
विघ्नहर्त्या गणेशाच्या नेहमीच्या दहा दिवसांऐवजी यंदाच्या बारा दिवसांच्या मुक्कामास चंद्र-सूर्याची खगोलशास्त्रीय गती कारणीभूत आहे. दशमी तिथीत वृद्धी झाल्याने बाप्पांचा मुक्काम यंदा दोन दिवसांनी वाढला. याला कोणत्याही प्रकारचे आध्यात्मिक महत्त्व नाही. पण गणपती बाप्पा दोन दिवस थांबणार म्हटल्यावर गणेशभक्तांना आनंद आहे. तेवढे दिवस गणेशाची उपासना करण्याची संधी मिळणार आहे, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. 
 
विघ्नहर्ता गणराय १२ दिवसांसाठी मुक्कामाला येण्याचा गेल्या शंभर वर्षांतील हा चाैथा योग आहे. यापूर्वी १९५५, १९३५, १९८१ मध्ये बारा दिवसांच्या गणेशोत्सवाचा योग आला होता.
बातम्या आणखी आहेत...