आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 शाळांची चौकशी पूर्ण : गोपनीय अहवाल 8 दिवसांत सादर होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अनेक शिक्षण संस्थांनी गुरुजींची भरती प्रक्रिया पार पाडताना आरक्षणात भलतीच ‘शाळा’ केल्याचा गंभीर प्रकरणाला डीबी स्टारने वाचा फोडताच खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होताच मनविसे व पँॅथर विद्यार्थी संघटनांनी याप्रकरणी तक्रारी दाखल केल्या. लगोलग सर्व शाळांची चौकशी पूर्ण करण्यात आली असून लवकरच त्याचा गोपनीय अहवाल आठ दिवसांत शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे.

काही शाळांनी भरती करताना आरक्षणाचे सर्व नियम धाब्यावर ठेवल्याचा ठपका विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सहायक आयुक्तांनी ठेवला होता. त्यानंतर 12 शाळांची चौकशी करण्याचे आदेश जि. प. शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, कुठलीही कारवाई होत नव्हती. अखेर याबाबत डीबी स्टारने ‘गुरुजींच्या आरक्षणात शाळा’ ही वृत्त मालिका प्रकाशित केली. त्यामुळे सर्व अधिकारी खडबडून जागे झाले. शिक्षण विभाग व संस्थाचालकांचे धाबे दणाणले. पाठोपाठ मनविसे व पँथर विद्यार्थी संघटनांनी तक्रारी दाखल केल्या.

शाळांची चौकशी पूर्ण : शिक्षणाधिकारी व संस्था यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीला वेग आला असून शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान व उपसंचालक सुखदेव ढेरे यांना मनविसेचे मराठवाडा उपाध्यक्ष वैभव मिटकर, पँथर विद्यार्थी आघाडीचे सिद्धार्थ साळवे यांनी निवेदन दिले आहे. याप्रकरणी कारवाई करा, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. डीबी स्टारच्या वृत्ताची गंभीर दखल घेत या प्रकरणात जि.प. शिक्षण विभागाने 12 शिक्षण संस्थांची तपासणी युद्धपातळीवर करून त्याचा अहवाल तयार केला असून तो लवकरच सादर केला जाईल, असे विस्तार अधिकारी सुधाकर दुतोंडे यांनी सांगितले.