आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"त्या' १२ रिक्त पदांवर दीड महिन्यात नियुक्त्या, कृषिमंत्री खडसे यांची ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सहा महिन्यांपासून मराठवाड्यातील दोन्ही कृषी सहसंचालक, कृषी आयुक्तालयात चार कृषी संचालक इतर सहा विभागांत कृषी सहसंचालकांची पदे रिक्त आहेत. या १२ पदांवर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे.
ही पदे रिक्त असल्याने कृषी विभागाचे नियोजन कोलमडले असून त्याचा थेट परिणाम कृषी विकासावर होत आहे. दै. "दिव्य मराठी'ने २६ ऑक्टोबर रोजी वृत्त प्रकाशित करून यावर प्रकाश टाकला होता. रविवारी (२२ नोव्हेंबर) कृषिमंत्री एकनाथ खडसे औरंगाबादेत आले असता दीड महिन्यात या जागांवर नियुक्त्या करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. दुष्काळावर मात करण्यासह शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे अावश्यक असताना रिक्त पदांमुळे त्रांगडे निर्माण झाले होते. विशेषत: औरंगाबाद आणि लातूर विभागातील पदे मे २०१५ पासून रिक्त आहेत. मात्र, आता ही अडचण दूर होण्याची चिन्हे आहेत.

अनेकांचेस्वप्न भंगणार !
ज्येष्ठतेनुसारकृषी संहचालक, संचालकांची पदे भरली जातात. २०१० पासून अनेक अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. औरंगाबाद, लातूर आणि इतर सहा असे आठ कृषी सहसंचालक, चार कृषी संचालकांची पदे तातडीने भरली असती तर ही पदे भूषवण्याचे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले असते. मात्र, वेळेत बढती देण्यास टाळाटाळ केल्याने काहींना डावलण्यात आल्याने अनेक जण बढतीच्या प्रतीक्षेतच सेवानिवृत्त झाले आहेत, तर काही अधिकारी सहा महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत.

आरक्षणामुळे उशीर झाला
सामान्यप्रशासनाकडेरिक्त पदाचा प्रस्ताव आला आहे. आरक्षणाचा विचार करून बढती द्यायची आहे. त्यामुळे वेळ लागला. पण लवकरच सर्व पदांवर नियुक्ती दिली जाईल. कृषी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. एकनाथ खडसे, कृषीमंत्री

जानेवारीतरुजू होतील
या१२रिक्त पदांसाठी फाईल आल्या आहेत. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्या असून औरंगाबाद, लातूर, पुण्यासह सर्व रिक्त जागांवर नियुक्ती केली जाईल. जानेवारीत हे अधिकारी रुजू होतील. विकास देशमुख, राज्यकृषी आयुक्त