आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1210 Crores Planing Expenditure Sanctioned To Marathwada By Ajit Pawar

मराठवाड्याचा नियोजन आराखडा 1210 कोटींचा,उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांची वार्षिक योजना 1210 कोटींवर पोहोचली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या आराखड्याचा आढावा घेऊन पुढील वर्षाच्या आराखड्याला मंजुरी दिली. यामध्ये गतवर्षीपेक्षा 200 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
पवार यांनी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत विकासकामांचा आढावा घेतला. मागणीनुसार निधी देण्यात आल्याचा दावा पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. गतवर्षीचा सर्व निधी देण्यात आला असून, मार्चअखेरपर्यंत निधी खर्च होईल, असा दावा केला. पुढील वर्षीही सर्व निधी मिळेल असे आश्वासन दिले.
असे आहे चित्र...
जिल्हा-मावळत्या वर्षातील निधी-पुढील वर्षासाठी मंजूर निधी
(आकडे कोटीत)
130-150 जालना
107-125 परभणी
180-200 नांदेड
113-125 उस्मानाबाद
162-185 बीड
128-145 लातूर
72-80 हिंगोली
172-200 औरंगाबाद
1064-1210 एकूण