आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 127 Crore For The New LED Streetlight In Aurangabad

औरंगाबादेत लागणार १२७ कोटींचे नवे एलईडी पथदिवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे शहरात महापालिकेच्या वतीने १२७ कोटी रुपयांचे एलईडी पथदिवे बसविणे व त्यांची देखभाल- दुरुस्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पुढील वर्षभरात दिवे लावताना इलेक्ट्रॉन लायटिंग सिस्टिम कंपनीला खांबांवर जाहिरात फलक लावण्याचा हक्क राहणार नाही, असेही न्यायमूर्ती दीपक मिश्रा व प्रफुल्ल पंत यांनी निकालात स्पष्ट केले आहे.
आैरंगाबाद महापालिकेने ३ सप्टेंबर २०१४ रोजी इलेक्ट्रॉन लायटिंग कंपनीस कार्यादेश दिले. त्यात खांबावरील जाहिरातींचे हक्कही दिले होते. त्यास निविदा स्पर्धेतील शहा इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल डेव्हलपमेंट्स अँड कन्सल्टंट्स, पॉलिकॅम कंपन्यांनी आव्हान दिले होते. निविदा साक्षांकित नाही. चालू वर्षाचे व्हॅट रिटर्न दाखल केले नाही. निविदा घाईत मंजूर करण्यात आली. निविदेचा भाग नसताना जाहिरातीचे हक्क दिले. तत्कालीन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी स्थायी समिती बैठकीच्या दिवशीच कार्यादेश देऊन पदभार सोडला. असे मुद्दे मांडण्यात आले. ते मान्य करून १४ ऑक्टोबर २०१४ रोजी निविदा रद्द करण्यात आली. त्याला इलेक्ट्रॉन कंपनीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
निविदा प्रक्रियेसाठी नियमानुसार वेळ देण्यात आला, असे स्पष्ट करताना या प्रक्रियेचे वेळापत्रक कंपनीतर्फे सादर करण्यात आले. त्या आधारे निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सामंजस्य करारासंबंधी तांत्रिक समितीच्या अहवालात चर्चा झाली. तांत्रिक निविदेसोबत चालू वर्षाचे व्हॅट रिटर्न दाखल केले. तसा उल्लेख मूल्यमापन समितीच्या अहवालात अाहे. जाहिरात फलकासाठी मनपाने सर्वांना समान संधी मिळेल, अशा पद्धतीने स्वतंत्र निविदा काढावी, असे निर्देशही निकालात आहेत. इलेक्ट्रॉन कंपनीतर्फे अॅड. मनुकुमार सिंघवी, मनपातर्फे ज्येष्ठ विधिज्ज्ञ शाम दिवाण, अॅड. सुधांशु चौधरी यांनी काम पाहिले.