आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापास विद्यार्थ्यास गंगापूरच्‍या मुक्तानंद महाविद्यालयाने बारावी परीक्षेस बसवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नापास झालेल्या एका विद्यार्थ्यास गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयाने प्रवेश देऊन बारावी परीक्षेस बसवले. ऑक्टोबरच्या निकालात उत्तीर्ण झाल्यावर संपादित गुण का देण्यात आले नाहीत म्हणून पालकांकडून आलेल्या अर्जानंतर महाविद्यालयाचा हा गैरप्रकार उघडकीस आला. त्यामुळे अनधिकृत प्रवेश दिल्यामुळे महाविद्यालयास बोर्डाने १० हजार रुपये दंड आकारला आहे.

२००६ मध्ये मूळ कॉलेज सरस्वती महाविद्यालय, भराडी येथील एक विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झाला होता. त्याने २०१३-१४ मध्ये परीक्षेसाठी अर्ज केला; परंतु हा अर्ज भरताना नियमानुसार ज्या महाविद्यालयात शिकत होता तिथूनच तो अर्ज भरायला हवा होता. परंतु, त्याला मुक्तानंद महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.

असा प्रवेश देता येत नाही
-नापासझालेल्या विद्यार्थ्याने त्याच्या मूळ महाविद्यालयातून परीक्षा द्यायची असते. नापास असतानाही असा प्रवेश देता येत नाही. नियम असतानाही महाविद्यालयांची अशी चूक विद्यार्थ्यांनाही नुकसान देणार आहे. प्रथमच असा प्रकार समोर आला आहे. सुखदेवडेरे, अध्यक्ष,एसएससी बोर्ड.