आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षीपेक्षा 2 टक्क्यांनी निकाल वाढला, तरीही औरंगाबाद जिल्ह्याची एका क्रमांकाने घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बारावी परीक्षेत औरंगाबाद विभागाने राज्यात चौथा, तर औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याने तिसरा क्रमांक (८९.८३ टक्के) मिळवला. विभागात परभणी प्रथम, बीड द्वितीय, तर हिंगोली चौथ्या, जालना पाचव्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून लाख ५७ हजार ४४६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी लाख ४१ हजार ४३२ विद्यार्थी उत्तीर्ण, तर १६ हजार १४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. 

औरंगाबाद जिल्ह्यातून ५९ हजार ६४३ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी ५३ हजार ५३८ उत्तीर्ण, हजार १०५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन टक्क्यांनी निकाल वाढला, असे बोर्डाचे विभागीय अध्यक्ष शिशिर घोनमोडे यांनी सांगितले. २०१४ मध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९१.२४, तर २०१५ मध्ये ९२ टक्के, २०१६ मध्ये ८७.७१ टक्के होता. यंदा तो ८९.७६ टक्के लागल्याने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्याला नव्वदी गाठण्यात अपयश आले आहे. 

जिल्हानिहाय निकाल
औरंगाबाद- ८९.७६ टक्के 
बीड - ९०.४९ टक्के 
परभणी - ९०.४९ टक्के 
जालना - ८८.४९ टक्के 
हिंगोली - ८९.६२ टक्के 
एकूण निकाल ८९.८३ टक्के 
मुलांच्यातुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ४.६४ टक्के अधिक आहे.

शाखानिहाय निकाल...
विज्ञान शाखा - ९५.७४ टक्के 
वाणिज्य शाखा - ९१.५७ टक्के 
कला शाखा - ८३.६१ टक्के 
एचएससी व्होकेशनल - ८५.२४ टक्के 
 
जूनला मिळेल गुणपत्रिका...
मंगळवारीऑनलाइन जाहीर झालेल्या निकालाच्या गुणपत्रिका जून रोजी विभागीय मंडळामार्फत महाविद्यालयांना सकाळी ११ वाजता आणि दुपारी वाजेनंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयांतून मिळतील. 

गुणपडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून ३१ मेपासूनच विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी छायांकित प्रतीसाठी अर्ज करता येतील. मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना असेल. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रतीसह जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येतील. उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठीही १९ जूनपर्यंत अर्ज करता येतील. 

११ जुलै पासून पुरवणी परीक्षा...
बारावीचीपुरवणी परीक्षा ११ जुलैपासून घेतली जाणार आहे. यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रियेच्या तारखा लवकरच जाहीर होतील, असे मंडळातर्फे कळवण्यात आले आहे. 

चार महाविद्यालयांत यापुढे परीक्षा केंद्र नाही 
दरम्यान,परीक्षेतील गैरप्रकार, नियमभंगाचा ठपका ठेवून चार परीक्षा केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात आली आहे. त्याचा तपशील असा. कोहिनूर कॉलेज, खुलताबाद - सहकेंद्र संचालक बदलला म्हणून बोर्डाच्या अधिकाऱ्यास मारहाण. राजकुँवर विद्यालय, हिवराळा - परीक्षेनंतर वर्गात गाइड सापडले. ११ वर्ग खोल्या असतानाही सहा वर्गांमध्ये विद्यार्थी कोंबले होते. एस. एस. नाईक महाविद्यालय, बोकुड जळगाव, जयभवानी कनिष्ठ महाविद्यालय, पाटोदा - कॉपी, एकाच वर्गात विद्यार्थी कोंबले. 
 
सकाळी ठेवला ४७१ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव, दुपारी जाहीर केला 
औरंगाबादविभागातील ४७१ विद्यार्थ्यांचा बारावीचा निकाल नियम मोडून गणित विषय दिल्यामुळे राखून ठेवण्यात आल्याचे सकाळी सांगण्यात आले. दुपारी शासनाच्या सूचनेनुसार तो जाहीर केल्याचे राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर ममाणे यांनी सांगितले. 

२७३ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण 
यंदा बारवीच्या २७३ विद्यार्थ्यांना क्रीडा नैपुण्यासाठी असलेल्या सवलतीच्या गुणांचा फायदा झाला आहे. १५, २० आणि २५ असे क्रीडा स्पर्धेच्या स्तरानुसार गुण देण्यात आले आहेत. 

३४५ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव 
दरम्यान,परीक्षेचा अर्ज भरताना एक आणि प्रत्यक्षात दुसऱ्या विषयाचा पेपर देणे तसेच ग्रेडचे गुण महाविद्यालयांकडून मिळाल्याने ३४५ जणांचे राखीव ठेवण्यात आले. 

दहा जण निर्दोष 
उत्तरपत्रिकांतील शेरेबाजीच्या २२२ प्रकरणांवर सुनावणी झाली. त्यात २१२ विद्यार्थी दोषी तर १० निर्दोष आढळले. 

मुलींनी सांगितले मुले मागे का? 
प्रत्येक परीक्षेत मुलीच जास्त संख्येने उत्तीर्ण होतात. मुले मागे राहतात, त्यामागे काय रहस्य, असे मुलींना विचारले असता त्यांनी सांगितले की, 
१) मुले अभ्यासात आमच्यापेक्षा हुशार असले तरी बहुतांश जण अभ्यासाबाबत गंभीर नसतात. 
२) विशेषत: वर्गात शिकवणे सुरू असताना मुले गंभीर नसतात. 
३) मित्रांसोबत गप्पा, भटकण्यात मुलांचा मोलाचा वेळ जातो. 
४) मोबाइलवरच मुलांचे अधिक लक्ष असते. 
५) बहुतांश मुली करिअर महत्त्वाचे मानून अभ्यास गांभीर्याने घेतात. 
६) आई-वडील आपल्या शिक्षणावर पैसा खर्च करत असल्याची जाणीव मुलींना अधिक असते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा, 
>मुला - मुलींच्या यशातील फरक असा...
> बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काय?
बातम्या आणखी आहेत...