आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी; दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने वेबसाइटवर होणार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/औरंगाबाद- बारावी फेरपरीक्षेचा निकाल येत्या सोमवारी 21 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने ही माहिती दिली आहे.
 
ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल विद्यार्थांना पाहता येणार आहे.  विद्यार्थांच्या गुणपत्रिकांचे वाटप संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामार्फत 24 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थांना आपल्या गुणांची पडताळणी करावयाची आहे. त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित शुल्कासह 22 ऑगस्ट पर्यंत संबंधित विभागीय मंडळातर्फे अर्ज करावा. त्यासोबत ऑनलाईन निकालाची प्रत किंवा गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
 
या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून 5 दिवसांत पुर्नर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...