आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांत 13 हजार जणांनी अंगीकारले गांधी विचार, देवगिरीतील अध्ययन केंद्र बनले विचारपीठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रत्येक क्षेत्रातील वाढती स्पर्धा, आर्थिक-सामाजिक विषमतेमुळे निर्माण होणारा द्वेष यातून समाजात अराजक निर्माण होत आहे. या हेव्यादाव्यांचा भावी पिढीवरही परिणाम होतो. मात्र, अशा स्थितीत अहिंसेतून निर्माण होणाऱ्या सकारात्मकतेचा स्वअनुभव घेत भावी पिढी गांधी विचारांकडे वळली आहे. गांधीजींचे विचार अंगीकारण्याच्या ध्यासातून गत ११ वर्षांत १३ हजारांहून अधिक जणांनी देवगिरी महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्रात शिक्षण घेतले आहे. 

केंद्र संचालक राहुल साळवे म्हणाले, ऑगस्ट २००७ रोजी गुजरात विद्यापीठाचे कुलपती नारायणभाई देसाई यांच्या हस्ते केंद्राची स्थापना झाली. ज्या विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशा महात्मा गांधी यांचे विचार भावी पिढीत रुजावे, या उद्देशाने केंद्र चालवले जात आहे. 

देवगिरी महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्रात दरवर्षी सात ते आठ हजार विद्यार्थी गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करून परीक्षा देतात. हर्सूल, पैठण कारागृहातील कैदीही गांधी विचाराने प्रेरित होऊन परीक्षा देतात. या केंद्रामार्फत डिप्लोमा इन गांधी थॉट हा एक वर्षाचा तर गांधी जीवन आणि कार्य हा सहा महिन्यांचा सर्टिफिकेट कोर्स चालवला जातो. गांधींच्या जीवनावरील अभ्यास आणि त्यांच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथालयात तीन हजारांहून अधिक पुस्तकेही आहेत. प्रत्येक महिन्यात दोन दिवस (शनिवार) त्यांना ज्ञान दिले जाते. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीतून गांधी विचाराकडे वळलेला लक्ष्मण गोळे हा कैदी याचे उदाहरण आहे, असे राहुल साळवे यांनी सांगितले. 

दिग्गजांचे मार्गदर्शन 
हेकेंद्र सुरू झाल्यापासून अमेरिकतील गांधी विचारवंत मार्क लिंगले, न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, महात्मा गांधी यांची नात सुमित्रा कुलकर्णी, गांधीजींचे पणतू तुषार गांधी, मेधा पाटकर, केंद्रीय गांधी स्मारक निधीचे सचिव रामचंद्र राही या मान्यवरांनी व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
बातम्या आणखी आहेत...