आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 14 Lakhs Theft By The Hack EMail Id In Aurangabad

नकारात्मक बातमी: ई-मेल आयडी हॅक करून घातला १४ लाखांचा गंडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील व्यावसायिक हेमंत मिरखेलकर (५१, रा. सम्राटनगर, दर्गा रोड) यांना भामट्याने १४ लाख रुपयांनी ऑनलाइन गंडा घातला. मिरखेलकर अनेक वर्षांपासून इंग्लंडच्या कंपनीतून उद्योगांसाठी लागणारे केमिकल्स मागवतात. कंपनीकडून पैशांच्या मागणीचा ई-मेल आल्यानंतर पैसे कंपनीच्या बँक खात्यात जमा केले जातात. या महिन्यातही मिरखेलकर यांनी केमिकल मागवले. मात्र, त्याच वेळी त्यांना आमचे बँक अकाउंट बदलले आहे, असा ई-मेल कंपनीच्या नावाने आला.
त्यामध्ये नवीन अकाउंटवर पैसे भरावेत, असे लिहिले होते. त्यानुसार मिरखेलकर यांनी नवीन अकाउंटमध्ये पैसे टाकले. तरीदेखील कंपनीने माल पाठवला नाही. याबाबत विचारणा केली असता पैसे मिळाले नसल्याने केमिकल पाठवले नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. तेव्हा मिरखेलकर यांनी पैसे पाठवल्याचे पुरावे कंपनीला पाठवले. तेव्हा तुम्ही चुकीच्या अकाउंटमध्ये पैसे भरले असल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मिरखेलकर यांच्या लक्षात आले. या प्रकरणी मिरखेलकर यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कशी झाली फसवणूक?
मिरखेलकर किंवा इंग्लंडमधील केमिकल कंपनीचा ई-मेल आयडी हॅक करून भामट्याने मिरखेलकर यांच्याशी खोटा पत्रव्यवहार करून गंडा घातला. १७ ते २३ जूनच्या दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी मिरखेलकर यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली.