आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक प्रकरणी भाईचंद हिराचंद सोसायटीच्या सर्व आरोपींना 23 जून पर्यंतची कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक मंडळी अशा 14 जणांना 23 जून पर्यंतची कोठडी सुनावली आहे. या सर्वांच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुदत संपल्यानंतरही ठेवी व त्यावरील व्याज अशी सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम देण्यास सोसायटीने नकार दिल्यानंतर एका व्यक्तीने तक्रार नोंदवली होती. 
 
 
भालचंद्र ओंकार खोडे (वय ७६, रा. जयभवानीनगर) असे फिर्यादीचे नाव आहे. सेवानिवृत्त असलेल्या खोडे यांनी १७ एप्रिल २०१३ रोजी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या एन सहा सिडको येथील शाखेत ठेव म्हणून ९५ हजार ७६८ रुपयांची गुंतवणूक केली. त्यावर आकर्षक व्याजदर, परतावा मिळेल, असे सोसायटीतर्फे सांगण्यात आले.
 
खोडे यांच्या प्रमाणेच एन ट सिडको परिसरातील महालक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी मच्छिंद्र सुर्यभान सुरासे (वय ५७) यांनी १ लाख १३ हजार रुपयांची ठेव या सोसायटीत ठेवली होती. पण, मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम व त्यावरील व्याज देण्यास सोसायटीने टाळाटाळ केली. पाठपुरावा करुनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या फिर्यादी खोडे व सुरासे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 
 
याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष भाईचंद हिराचंद रायसोनी (रा. जि. जळगाव) यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. दरम्यान सीआयडी पोलिसांनी आज त्यांना जळगावहुन हस्तांतरित करून औरंगाबादला आणले. न्यायालयाने 14 आरोपींना 23 जून पर्यंत कोठडी सुनावली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...