आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिस कॉलनीमध्येच पकडले पंधरा वीजचोर, महावितरणची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात वीज चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यातून पोलिस कॉलनीही सुटलेली नाही. बुधवारी सकाळी महावितरणच्या पथकाने पोलिस कॉलनीत वीज चोरी पकडली. एका ठिकाणी मीटर जाळण्याचा प्रकार घडला. एकूण १५ कनेक्शन तोडण्यात आली आहे. विशेष म्हणजे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना स्वत: कारवाईसाठी हजर राहावे लागले. 
 
पोलिस कॉलनी, शताब्दीनगरात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या आधारे पथक नियुक्ती करून कारवाईसाठी पाठवले असता पथकाला पोलिस कर्मचाऱ्यांनी धाकदपटशा दाखवून परत फिरवले. पथकाने मुख्य अभियंता सहव्यवस्थापकीय संचालक बकोरिया यांना ही माहिती दिल्यानंतर बुधवारी सकाळी अचानक तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत वीज चोरी उघडकीस आली. एकूण १५ वीज चोऱ्या पकडल्या. एकाने वीज चोरी पकडू नये म्हणून विद्युत मीटरच जाळण्याचा प्रयत्न केला. तो पथकाने हाणून पाडला तपासणीसाठी मीटर ताब्यात घेतले. वीज चोरांवर चौकशीनंतर गुन्हे दाखल होतील, असे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले. 
 
५७५१ वीज चोऱ्या पकडल्या एप्रिलते ३० सप्टेंबरदरम्यान परिमंडळात हजार ७५१ जणांची ५००.१ लाखांची वीज चोरी पकडण्यात आली. त्यापैकी १८४४ जणांवर पोलिसांत गुन्हे दाखल केले. वाळूजमध्ये ६२ जणांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. रंजनगावात रिमोटद्वारे वीज चोरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध वाळूज पोलिसांत गुन्हे नोंदवले. 
 
शताब्दीनगरात हवा सोडली, पेट्रोल काढले 
बी.एन. कडेल, अविनाश चव्हाण, गणेश जाधव, एलपुल्ला, अश्विनी देशमुख असे पाच अभियंते आणि २० कर्मचाऱ्यांच्या पथकाने पोलिस कॉलनीनंतर शताब्दीनगरातील वीज चोरांकडे मोर्चा वळवून आकडे टाकून वीज चोरणारे ३० जण पकडले. ही कारवाई सुरू असताना काही जणांनी पथकाच्या वाहनातील पेट्रोल काढले, हवा सोडून दिली.
बातम्या आणखी आहेत...