आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंधरा टक्के ग्राहक 4 जी, शहरातील ७० टक्के लोकांकडे थ्रीजी सेवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील नव्या पिढीत आता फोर जी एलटीई हँडसेटची क्रेझ वाढली असून तरुणांच्या या "डेटा हंग्री'ने सर्वच मोबाइल कंपन्यांमध्ये मोबाइल इंटरनेट अपग्रेड करण्याची बेफाम स्पर्धा लागली आहे. देशभरातही हाच ट्रेंड दिसून येत आहे. औरंगाबादेत अनेक कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणात शहरातील स्मार्टफोन युजर्सची संख्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त असून ९० टक्के तरुणांकडे आधुनिक मोबाइल फोन आहेत. या सर्वांनाच फोरजी इंटरनेट सेवेचे आकर्षण आहे. असे असले तरी सध्या शहरातील १५ टक्के ग्राहकच फोरजीचा आनंद घेत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून शहरात मोबाइल कंपन्यांनी फोरजी नेटवर्कसाठी केबलिंगचे काम सुरू केले आहे. पाच ते सहा मोबाइल कंपन्यांमध्ये फोरजी लाँच करण्याची तीव्र स्पर्धा आहे. यात काही कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम अजूनही सुरू आहे, तर काही कंपन्यांनी हे तंत्रज्ञान बाजारातही आणले आहे. तरुण पिढीला टूजी, थ्रीजी अन् फोरजी प्रकार काय आहे याची बऱ्यापैकी माहिती आहे. मात्र, मध्यमवयीन ज्येष्ठ नागरिकांना यातले फारसे कळत नसले तरी त्यांना थ्रीजी आणि फोरजी हँडसेटचे आकर्षण आहे, असे मोबाइल कंपन्यांचा सर्व्हे सांगतो. शहरात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या एकूण साडेसहा लाखांच्या घरात गेली आहे. ९० टक्के तरुणांकडे स्मार्टफोन असल्याने ब्रॉडबँड जनरेशनमध्ये खूप वेगाने बदल होत आहेत. डीएमआयसीच्या पार्श्वभूमीवरही औरंगाबादकडे जगाचे लक्ष असल्यानेही फोरजीची क्रेझ वाढली आहे.
कायआहे ही "जी'ची भाषा : पूर्वीसंगणकामध्येही पिढ्या होत्या. हा प्रवास ३८६ ते पेंटियमपर्यंत सामान्यांना माहीत होता. त्याच धर्तीवर मोबाइलमध्ये इंटरनेट स्पीडच्या पिढ्या (जनरेशन) ठरवल्या. पहिली पिढी म्हणजे टूजी अर्थात सेकंड जनरेशन. नंतर थ्रीजी (थर्ड जनरेशन) आणि आता आली ती फोर्थ जनरेशन ब्रॉडबँड सेवा. पूर्वीच्या पिढ्यांत डेटा एक्स्चंेज किंवा डाऊनलोडिंगची गती कमी होती. भारतातील तरुणाईत सोशल नेटवर्किंग, वेब ब्राउझिंग,व्हिडिओ शेअरिंगचे प्रमाण वाढल्याने फोरजीची गरज भासू लागली आहे. कंपन्यांच्या सर्व्हेनुसार २०२० पर्यंत देशात १०० दशलक्ष लोकांकडे जीचे नेटवर्क असेल.

शहरात१५ टक्के ग्राहकांकडे जी
जीचेनवे हँडसेट बाजारात परवडतील अशा किमतीत येत आहेत. तसेच अनेक जुने स्मार्टफोनही ४जी कम्पॅटिबल असल्याने मोबाइल कंपन्या फक्त जीचे अपडेटेड सिमकार्ड टाकून देत आहेत. काही कंपन्यांनी ही सेवा सुरू केली असून त्याची प्रचंड गती आहे. डाऊनलोडिंग शून्य मिनिटांत होत असल्याने तरुणाईत ४जीची प्रचंड क्रेझ आहे. मात्र, आईवडिलांना जास्त बिलाची िचंता वाटत असल्याने मुलांना अजूनही थ्रीजीच वापरावे लागत आहे. शहरात सध्या तरी फोरजी नेटकवर्कचे युजर्स व्यापारी, डॉक्टरसह नोकरदार धनाढ्य घरची मुलेच वापरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

रोजगारला संधी : जनरेशनबँडमुळे शहरात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. इंटरनेट ऑनलाइन काम करून घरबसल्या पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळत आहेत. फूल टाइम पार्ट टाइम जॉबचा प्रकारही अस्तित्वात आले आहेत. बारावी ते पदवीधर तरुणांना महिना २२ हजार ते ४७ हजार रुपये पगारदेखील कंपन्यांनी ऑफर केले.

खिशावरचा ताण
इंटरनेट वापरामुळे अनेकांचे मासिक बिल हजार रुपयांच्या घरात आहे. फोरजीच्या वापरामुळे खिशावरचा ताण आणखी वाढणार आहे.

कसा ओळखावा जी हँडसेट
मोबाइल हँडसेटच्या नेटवर्क मोडमध्ये एलटीई नेटवर्कचा उल्लेख असलेले हँडसेट जी नेटवर्क सपोर्ट करणारे समजावेत.

४ जी हँडसेट ऑफर
जी सिमकार्ड सेवा घेतलेल्या अनेकांना थ्रीजीची स्पीड मिळते आहे. याबाबत विचारणा केली असता तज्ज्ञांनी सांगितले की, हँडसेट अनुरूप नसल्याने हा प्रकार होत आहे. काही कंपन्यांची स्पीडही कमीच असल्याने जीवर थ्रीजीची स्पीड मिळत असल्याचे विक्रेत्यांनी खासगीत सांगितले. फोर जी नेटवर्क सपोर्ट करणारे हँडसेट हजार रुपयांपासून बाजारात उपलब्ध आहेत. अनेक कंपन्यांनी टक्के कॅशबॅक योजना आखली आहे.

काय आहे ४जी एलटीई नेटवर्क
फोरजी म्हणजे फोर्थ जनरेशन आणि एलटीई म्हणजे लाँग टर्म इव्हॉल्युशन. थ्रीजी तंत्रज्ञानापेक्षा फोरजी तंत्रज्ञानामध्ये दहापट अधिक गतीने डेटा वहन करण्याची क्षमता आहे. अधिक खोल जाऊन सांगायचे झाल्यास फोर जीमध्ये कमीत कमी १०० मेगाबाइट आणि जास्तीत जास्त गीगाबाइट डेटा प्रतिसेकंद आदानप्रदान करता येतो.