आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंधरा शाळांना जि. प. ची नोटीस, चुकीचा पत्ता देऊन प्रशासन आणि पालकांची केली फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आरटीईनुसार प्रवेशासाठी पालकांनी रीतसर ऑनलाइन अर्ज केले. ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा त्याविषयीचे एसएमएसही त्यांना पाठवण्यात आले. मात्र, पाल्याच्या प्रवेशासाठी गेलेल्या पालकांना दिलेल्या पत्त्यावर शाळाच सापडल्या नाहीत. यामुळे शेकडो पालकांची एकच धांदल उडाली. प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. त्यामुळे चुकीचा पत्ता देणाऱ्या परस्पर स्थलांतर करणाऱ्या पंधरा शाळांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाने नोटिसा बजावल्या असून याचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे.

बालकांना मोफत हक्काच्या शिक्षण कायद्यान्वये प्रवेशासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवली जाते. लॉटरी पद्धतीने सोडत काढून त्याचा अहवाल पुण्याच्या एनआयसीकडे रवाना करण्यात आला. यावर सेंटरने अंतिम शिक्कामोर्तब करून त्याविषयी पालकांना एसएमएस, ईमेलद्वारे कळवून शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करण्याचे सांगितले. पालकांनी शाळांचे ऑनलाइन पत्ते बघितले. मात्र, प्रत्यक्षात प्रवेश घेण्यासाठी पालक या पत्त्यावर गेले तेव्हा या शाळा तेथे आढळून आल्या नाहीत. या शाळा शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी घेता परस्पर स्थलांतरित करण्यात आल्या. ज्या शाळांविषयी तक्रारी आल्या त्यांची शहानिशा केल्यावर शिक्षण विभागाने या शाळांना मान्यता रद्दबाबत नोटिसा बजावल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...