आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील ११ गावांत १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा, अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा ३४ ते ४३ टक्के कमी पर्जन्यमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यातील सिद्धनाथ वाडगाव, खुलताबाद, देवगाव रंगारी सर्कलमध्ये सरासरीपेक्षा ३४ ते ४३ टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे या सर्कलमधील अकरा गावांत पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाल्याने १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 

पाच वर्षांनंतर यंदा मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. पण स्थलनिहाय पर्जन्यमानात मोठा फरक आहे. कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस पडला. अशाच प्रकारे सिद्धनाथ वाडगाव सर्कलमध्ये ५६.८० टक्के, खुलताबाद ६६, देवगाव रंगारी ६९ टक्केच पर्जन्यमान झाले. गारज सर्कलला १०१ टक्के पाऊस पडला. पण शेवटच्या गावात कमी पाऊस पडला. त्यात गंगापूर तालुक्यातील घोडेगाव, तांदुळवाडी, बोलठाण, शहापूर, शिल्लेगाव, सिद्धनाथ वाडगाव, टोकी, इब्राहिमपूर, वैजापूर तालुक्यातील मालेगाव, खिर्डी कन्नड, अवराळी, सासेगावचा समावेश आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार ११ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन रबडे यांनी दिली. आणखी काही गावांतून पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी हाेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
असा झाला पाऊस (टक्के) 
सिद्धनाथ वाडगाव ५६.८०
खुलताबाद६६
देवगावरंगारी ६९
गारज१०१
 
राज्य प्रधान सचिवांचा प्रश्न 
सरासरीपेक्षाजास्त पाऊस होऊनही या गावांत पाणीटंचाई का, असा प्रश्न राज्य प्रधान सचिवांनी त्यांना विचारला असता या गावच्या सर्कलमध्ये सरासरीपेक्षा ३४ ते ४३ टक्के पाऊस कमी पडल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाल्याचे रबडे यांनी स्पष्ट केले.