आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीत 15 महिला होणार पोलिस पाटील; पदाची पुन्हा आरक्षण सोडत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- तालुक्यातील पोलिस पाटलाच्या ४९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी ३० डिसेंबर रोजी औरंगाबाद येथील पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यापूर्वी १६ डिसेंबर रोजी पोलिस पाटील पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, या आरक्षण सोडतीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे परत आरक्षण सोडत काढण्यात आली.

यामध्ये फुलंब्री तालुक्यात ४९ गावांत घेण्यात येणाऱ्या पोलिस पाटील पदाच्या भरतीमध्ये प्रथमच १५ महिला पोलिस पाटीलपदी विराजमान होणार आहेत. यामध्ये भटक्या जमाती ( ब) - जळगाव मेटे, कान्होरी. भटक्या जमाती (क) - सुलतानवाडी (महिला), वडोद खुर्द, वानेगाव बुद्रूक, विशेष मागासप्रवर्ग - धानोरा (महिला), बाभूळगाव तरटे, किनगाव, मारसावळी, अनुसूचित जमाती : शेलगाव (महिला), अनुसूचित जाती - बिल्डा (महिला), बोधेगाव बुद्रूक, लोहगड नांद्रा. सर्वसाधारण : निमखेडा (महिला), पिंपळगाव देव, कविटखेड, साताळ पिंप्री, आडगाव खुर्द, भावडी (महिला), निधोना, लालवण, धामणगाव (महिला), डोंगरगाव कवाड, ममनाबाद, म्हसला, पेडगाव आळंद, पिंपळगाव वळण (महिला), रांजणगाव, रिधोरा देवी, शेवता बु., विरमगाव(महिला), वाघलगाव, वाघोळा (महिला), वानेगाव खुर्द, भालगाव, गुमसातळा (महिला), चिंचोली बु., नायगाव (महिला), भटक्या जमाती (क) सुलतानवाडी (महिला), वडोद खुर्द. इतर मागासवर्गीय वारेगाव, बाभूळगाव खुर्द, लहान्याची वाडी, टाकळी कोलते, वाहेगाव, पाथ्री (महिला), शेवता खुर्द आदी गावांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...