आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य बजेटमधून शहरातील रस्त्यांसाठी दीडशे कोटी, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील रस्त्यांच्या प्रश्नाबाबत प्राथमिकता ठरवा. यासाठी १५० कोटी रुपयांचे विशेष अनुदान बजेटमधून दिले जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा वार्षिक आराखड्याच्या राज्यस्तरीय बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

औरंगाबाद जिल्ह्याचा वार्षिक आराखडा २२४ कोटी रुपयांचा आहे. यामध्ये २२४ कोटी रुपयांचीच अतिरिक्त मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, प्रशांत बंब, भाऊसाहेब चिकटगावकर, सुभाष झांबड यांची उपस्थिती होती. 

पूल कोसळण्याची वाट पाहत आहात का?
याबैठकीत आमदार इम्तियाज जलील यांनी शहरातील पाणचक्की, मकाई गेट या पुलांबाबत विचारणा केली. कोकणातील दुर्घटनेसारख्या दुर्घटनेची सरकार वाट पाहत आहे का, असा सवाल त्यांनी केला. अतुल सावे यांनीही शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था असून त्यासाठी निधी देण्याची मागणी केली, तर खासदार चंद्रकांत खैरे यांनी तिन्ही पुलांसाठी निधी देण्याचेे सांगितले होते. मात्र, अजूनही हे पूल बांधले जात नसल्याची तक्रार मांडली. 

फक्त प्रस्ताव पाठवू नका, फॉलोअप घ्या 
याबाबतमुनगंटीवार यांनी मनपा आयुक्तांना रस्त्याच्या आणि पुलांच्या प्रकरणात फॉलोअप घेण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांनी प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले असता प्रस्ताव पाठवला म्हणजे झाले, असे होत नाही. त्याचा फॉलोअपदेखील घ्या, अशी सूचना केली. 
बातम्या आणखी आहेत...