आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनासाठी १५० टँकर पाणी ९० लाख खर्चून मार्गावर ठिगळपट्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली असून खड्ड्यांवरून प्रचंड गदारोळ झाल्यानंतर जवळपास ९० लाख रुपये खर्चून मिरवणुकांच्या मार्गांवरील रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले आहे, तर आठ विसर्जन विहिरींमध्ये ४० टँकरच्या माध्यमातून १५० टँकर पाणी ओतले जाणार आहे. गणेश विसर्जनाआधी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवावेत यावरून मागच्या महिनाभरापासून मनपात रामायण सुरू आहे. शेवटी मनपा आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून प्रभागांत प्रत्येकी लाख रुपयांची पॅचवर्कची कामे सुरू केली. ही कामे आज सायंकाळपर्यंत पूर्ण झाली आहेत. विसर्जन मिरवणुकींच्या मार्गावरील त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही ठिगळपट्टी करण्यात आली अाहे.
याप्रमुख रस्त्यांवरचे खड्डे बुजवले : संस्थान गणपती ते स्वातंत्र्यसैनिक काॅलनीमार्गे औरंगपुऱ्यातील विसर्जन विहीर, जयभवानी चौक ते शिवाजीनगर, एव्हाॅन हाॅटेल ते मुकुंदवाडी , सातारा देवळाई परिसर, बजरंग चौक ते एन १२ मधील विसर्जन विहीर, जिल्हाधिकारी कार्यालय ते गणेश काॅलनी, जटवाडा रोड
विहिरींमध्ये टँकरने पाणी : रामनगर,मुकुंदवाडी, चिकलठाणा, शिवाजीनगर, सिडको एन १२, हर्सूल, औरंगपुरा सातारा-देवळाई या ठिकाणच्या आठ विहिरींमध्ये विसर्जनासाठी पाणी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ४० टँकरच्या माध्यमातून १५० फेऱ्या केल्या जाणार अाहेत. सिडको एन १२ आणि हर्सूल येथील विसर्जन विहिरीत जवळच्या काही विहिरींतून पाणी आणून टाकले जात आहे. विसर्जन विहिरींवर कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्येकी दोन लाइफगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

निर्माल्य संकलनाची सोय : आठहीविसर्जन विहिरींच्या जवळ निर्माल्य संकलनासाठी मनपाने व्यवस्था केली आहे. विसर्जनासाठी मिरवणूक विहिरीजवळ येताच त्यांच्याकडील निर्माल्य गोळा करून पिकअप रिक्षांत संकलित केले जाणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रत्येकी चार कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.

घरगुती गणेशमूर्तींसाठी : घरगुतीगणेशमूर्तींचे मुख्य विहिरींत विसर्जन करता वाॅर्डांतच सुविधा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना सोयीचे होईल विहिरीवरील ताण वाढणार नाही तसेच गणेशमूर्तींचे पावित्र्यही जपले जाईल, या हेतूने ‘दिव्य मराठी’ने आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चार नगरसेवक या कामांसाठी पुढे आले आहेत. त्यांनी तशी सुविधा करून दिली आहे. क्रांती चौक वाॅर्डाच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर यांनी झांबड इस्टेटमध्ये तर आविष्कार काॅलनीचे नगरसेवक शिवाजी दांडगे यांच्या वतीने बजरंग चौकात ड्रम पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यानगर वाॅर्डात नगरसेवक राजू वैद्य यांनी मनपाच्या मोकळ्या भूखंडावर तळे तयार करून दिले आहे. ज्योतीनगरात नगरसेविका सुमित्रा हाळनोर माजी नगरसेवक गिरिजाराम हाळनोर यांनी दोन ठिकाणी तळी तयार केली आहेत.
गरजेनुसार मार्ग बंद किंवा सुरू : शहरातीलमुख्य मार्गांवर दिवसभर वाहतूक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस इतर विभागाचे कर्मचारी, अधिकारी तैनात करण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. त्यामुळे प्रमुख मिरवणूक निघणारे मार्ग पूर्णत: बंद ठेवले जाणार नाहीत. ड्युटीवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांना परिस्थितीनुसार मार्ग बंद किंवा सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

हे प्रमुख मार्ग वाहतुकीस बंद
>चिश्तियाकॉलनी चौक, बजरंग चौक, सिडको ठाण्यासमोरून एन-७ बस थांबा, जळगाव रोडने आंबेडकर चौक, एन-९, एम-२, एन-११, टी. व्ही. सेंटर चौकामार्गे एन-१२ स्वर्ग हॉटेलजवळील विहिरीपर्यंत मार्ग बंद.
>जिल्हाधिकारी कार्यालय, चांदणी चौक ते टीव्ही सेंटर रस्ता.
>एन-१ चौक ते चिश्तिया कॉलनी, अाविष्कार चौक, सेंट्रल जकात नाका ते अाविष्कार चौक, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्यालय ते द्वारकादास साडी सेंटर, अाविष्कार चौक.
>आझाद चौक ते बजरंग चौक, देवगिरी नागरी सहकारी बँक ते बजरंग चौक, बळीराम पाटील हायस्कूल ते ओंकार चौक, वेणुताई चव्हाण हायस्कूल, सिडको पोलिस ठाणे ते ओंकार चौक, आंबेडकर चौक ते बळीराम पाटील चौक, पार्श्वनाथ चौक ते जिजाऊ चौक, शरद टी पाॅइंट ते टीव्ही सेंटर चौक
>गजानन मंदिर, जवाहरनगर पोलिस स्टेशनसमोरील चौक, गारखेडा सूतगिरणी, शिवाजीनगर विसर्जन पॉइंट, तसेच सेव्हन हिल्स ते गजानन मंदिर, त्रिमूर्ती चौक ते गजानन मंदिर, पतियाळा बँक ते गजानन मंदिर, सूतगिरणी रस्ता बंद राहणार आहे.
हे आहेत पर्यायी मार्ग
>जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गणेश कॉलनीमार्गे टीव्ही सेंटरकडे जाणारी वाहतूक हडको कॉर्नरमार्गे जाईल.
>पतियाळा बँकेकडून गजानन महाराज मंदिर चौकाकडून हिंदू राष्ट्र चौक, विजयनगर, गजानन कॉलनी, रिलायन्स मॉलमार्गे वावरता येईल.
>जवाहरनगर पोलिस ठाण्याकडून गजानन महाराज मंदिराकडे येताना माणिक रुग्णालय, डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने त्रिमूर्ती चौकातून पुढे जाता येईल.
>त्रिमूर्ती चौकाकडून गजानन महाराज मंदिराकडे येणारी वाहने डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या पाठीमागील रस्ता, माणिक रुग्णालय, जवाहरनगर पोलिस ठाण्यामार्गे वळवण्यात आली.
>सेव्हन हिल्स उड्डाणपूल, गजानन महाराज मंदिराकडून जालना रोडमार्गे आकाशवाणीकडे जाता येईल.
पोलिसांचे पथसंचलन
पोलिसांनीगेल्या दहा दिवसांत ५४२ लोकांना वाॅरंट बजावले, तर १४०० लोकांना समन्स दिले. १८०९ लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शक्तिप्रदर्शन करत शहरातील अतिसंवेदनशील १७ भागांतून पथसंचलन केले. बंदोबस्तासाठी २३०० कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...