आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त शिवार’साठी आठ जिल्ह्यांतील १५१८ गावांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानासाठी १५१८ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी १८५३ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च लागणार आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३६४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मराठवाड्यात दोन वर्षांपासून जलयुक्त शिवारची कामे सुरू आहेत. यात पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील १६८२ गावे निवडण्यात आली होती. मात्र, येथील कामे अजूनही प्रगतिपथावरच आहेत. या कामांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी २०४ कोटींचा आराखडा : औरंगाबादजिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानात २२३ गावांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ९१९७ कामांचे नियोजन करण्यात आले असून यात सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, शेततळे, नाला खोलीकरण, विहीर पुनर्भरण यासारखी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व २२३ गावांच्या शिवार भेटीही झाल्या असून गावांचे आराखडे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या वर्षी २२८ गावांची निवड करण्यात आली होती. त्यात ७२०९ कामांचे नियोजन केले होते. त्यापैकी ६४७५ कामे पूर्ण झाली आहेत.

उस्मानाबादसाठी ३६४ कोटींचा आराखडा
मराठवाड्यात सर्वाधिक ३६४ कोटींचा आराखडा उस्मानाबाद जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील १९१ गावांत १६७९५ कामांचे नियोजन केले आहे, तर लातूर जिल्ह्यात १७६ गावांत १४३४५ कामे करण्यात येत असून त्यासाठी ३२९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील २२३ गावांत ९१९७ कामांचे नियोजन केले असून २०४ कोटींचा आराखडा तयार केला आहे.

२०१६-१७ चा जलयुक्त शिवारचा आराखडा
जिल्हागावांची संख्या कामे किंमत (कोटीमध्ये)
औरंगाबाद २२३ ९१९७ २०४.०४
जालना १८६ ४६८० १६५.६८
बीड २५६ ८७१५ २८९.३८
परभणी १६० ५६१३ १७५.५१
हिंगोली १०० ५७६९ १३१.८०
नांदेड २२६ ७०८९ १९३.२५
लातूर १७६ १४३४५ ३२९.३४
उस्मानाबाद १९१ १६७९५ ३६४.७६
एकूण १५१८ ७२२०३ १८५३.७६
बातम्या आणखी आहेत...