आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धूमस्टाइलने व्यापा-याचे 16.5 लाख पळवले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - सुसाट धूमस्टाइल दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी कापूस व्यापा-याची सुमारे साडेसोळा लाख रुपये रकमेची बॅग पळवल्याचा प्रकार रोटेगाव रेल्वेस्टेशन रस्त्यावर शनिवारी भरदुपारी घडली.
शिऊर येथील गोदावरी जिनिंग-प्रेसिंगचे व्यवस्थापक मुकेश राधेश्याम शर्मा व काकासाहेब जाधव यांनी शनिवारी सकाळी बँक ऑफ हैदराबाद शाखेत चेक क्र. 423164 जमा करून 15 लाखांची रोकड काढली. नंतर किराणा व्यापारी नंदलाल मुगदिया यांच्याकडून 1 लाख 60 हजारांची रक्कम घेतली. एकूण 16 लाख 60 हजार रुपयांची रोकड शर्मा यांनी कापडी पिशवीत ठेवली व साथीदारासह ते शिऊरकडे मोटारसायकलने निघाले. स्वामी समर्थ हॉटेलजवळ गतिरोधकावर त्यांच्या मोटारसायकलचा वेग कमी होताच मागून वेगाने आलेल्या विनानंबरच्या पल्सर मोटारसायकलवरील चोरट्यांनी पिशवी हिसकावत पोबारा केला.