आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओबीसी, भटके विमुक्त संघर्ष समितीतर्फे मंगळवारी ‘रेल्वे रोको’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जात पडताळणीच्या विरोधात महाराष्ट्र ओबीसी, भटके विमुक्त संघर्ष समितीच्या वतीने 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 18 मे चा शासन निर्णय मागे घेण्याची मागणी समितीने केली आहे.

भटके विमुक्त, ओबीसी आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिले, पण त्याचा लाभ सहजासहजी मिळू न देण्याचे कटकारस्थान केले जात असल्याचा आरोप मल्हार सेनेचे प्रमुख लहुजी शेवाळे यांनी केला आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्याच्या दृष्टीने राधाकृष्ण मंगल कार्यालयात प्रल्हाद राठोड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत रेल्वे रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला राम पेरकर, विष्णू वखरे, अँड. महादेव आंधळे, प्रा. सदाशिव ढाके, प्रा. माणिक कांबळे, अमीनभाई जामगावकर, निशांत पवार, प्रा. भास्कर टेकाळे आदींची उपस्थिती होती.