आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीचा मेल हॅक करून 16 लाखांची फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अमेरिकेतील वाहनांचे पार्ट तयार करणाऱ्या कंपनीचा मेल हॅक करून त्याद्वारे शहरातील व्यापाऱ्याची १६ लाख २० हजार २५० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाचे मागील दहा वर्षांपासून या कंपनी सोबत असलेल्या व्यवहारामुळे त्यांना मेल हॅक झाला असेल, हा प्रकारच लक्षात आला नाही अाणि त्यांनी मेलद्वारे बदलून आलेल्या बँक खात्याची शहानिशा करताच पैसे पाठवले. 
 
साईनाथ रंगनाथ आहेर (५६, रा. चिकलठाणा एमआयडीसी) यांचा दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्टस विक्रीचा व्यवसाय आहे. वाहनांमध्ये बसवण्यात येणारा गॅस कीट ते अमेरिकेतील कंपनीकडून मागवतात. मागील दहा वर्षांपासून ते याच कंपनीशी जोडलेले असून ऑर्डर देण्यापासून पैशांचा लाखो रुपयांचा व्यवहार मेलद्वारेच करतात. १० ऑक्टोबर रोजी मात्र कंपनीच्या बनावट मेल आयडीद्वारे त्यांना कंपनीचा बँक खाते क्रमांक बदलला असून नवीन खाते क्रमांकावर पैसे पाठवण्यासंदर्भात मेल आला. आहेर यांनी मागवलेल्या मालानुसार रक्कम पाठवली, परंतु कंपनीने पैसे मिळाले नसल्याचा मेल केला. बँक खाते क्रमांकही बदलला नसल्याचे सांगितले. शहानिशा केली असता हा प्रकार बनावट मेल आयडी बनावट खाते क्रमांक तयार करून हॅकिंग प्रक्रियेद्वारे घडल्याचे समोर आले. त्यानंतर आहेर यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार दिली. निरीक्षक सुरेंद्र माळाळे तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...