आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्याचा उरलेला दीड महिनाही काेरडाच!, १६ टक्के कमी पावसाचा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई / औरंगाबाद - निम्म्याहून अधिक हंगाम संपला तरी पावसाचा रुसवा कायम असून पावसाळ्याचा उर्वरित दीड महिनाही कोरडाच जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळाचे संकट आणखी भीषण होणार आहे. खरिपाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत देशात १६ टक्के कमी पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सहा वर्षांनंतर देशावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. पावसाची तूट वाढल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, बिहार व पूर्व उत्तर प्रदेशात खरिपाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.

गेल्या अडीच महिन्यांत देशात सरासरीपेक्षा १० टक्के कमी पाऊस झाला. पावसाळा संपेपर्यंत ही तूट आणखी वाढून १२ टक्क्यांपर्यंत जाईल. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसाची तूट १६ टक्के असेल, असा अंदाज असल्याचे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठौर यांनी सोमवारी सांगितले. या तुटीमुळे खरिपाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे.
धरणांत ८ टक्केच साठा : मराठवाड्यात सिंचन प्रकल्पांत सध्या ८ टक्के उपयुक्त जलसाठा अाहे. १७ ऑगस्टपर्यंत ११ मोठ्या प्रकल्पांत ९, तर ७२८ लघु प्रकल्पांत ५ टक्के साठा आहे. गतवर्षी याच तारखेला मोठे प्रकल्प २३ तर लघु प्रकल्पांत १८ टक्के पाणीसाठा होता.
चार राज्यांत अतिवृष्टीचा इशारा : येत्या ४ दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम व प. बंगालमध्ये अतिवृष्टीचा वेधशाळेचा इशारा आहे. त्यामुळे कोसी, घाघरा, गंगा व ब्रह्मपुत्रेला महापूर येऊ शकतो. देशात अाजवर १० टक्के तूट होती. पावसाळा संपेपर्यंत ती १२ टक्के होईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांत पावसाची ही तूट १६ टक्के असेल.
- लक्ष्मण राठौर, महासंचालक, हवामान खाते
मांजरा, दुधना कोरडेठाक : मराठवाड्यातील जायकवाडी आणि येलदरी धरणांमध्ये पिण्यासाठी थोडेबहुत पाणी शिल्लक असले तरी मांजरा, लोअर दुधना, तेरणा, सिद्धेश्वर या धरणांमध्ये पिण्यासाठी अजिबात पाणी शिल्लक राहिलेले नाही.
ढगच येत नसल्याने कृत्रिम पाऊस ठप्प
मराठवाड्यात पाऊस नसल्याने एकीकडे पाण्याचे संकट गडद होत असताना दोन दिवसांपासून ढगच येत नसल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोगही बंद पडला आहे. इतर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण नसल्याने प्रयोगाला ब्रेक लागला आहे. मराठवाड्यात ४ ऑगस्टपासून कृत्रिम पाऊस प्रयोग सुरू झाला. सुरुवातीला चार दिवस काही प्रमाणात प्रयोगाला यश देखील मिळाले. आता रडार आल्यानंतर अचूक अंदाज येऊन जास्त पाऊस पडेल अशी आशा असताना पाऊस मात्र गायब झाला आहे.

रडार आले, ढग गायब
विभागीय आयुक्तालयात १४ जिल्ह्यांसाठी केंद्र उभारण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात १३६ फ्लेअर्सचा वापरही झाला. विमानातील रडारच्या माहितीआधारे प्रयोग सुरू झाला. १२ ऑगस्टला रडार पूर्णत: कार्यान्वित केले गेले. रडार लावल्यानंतर ढग गायब झाले आहेत. आजवर ९, १२ व १३ ऑगस्टला तांत्रिक कारणामुळे प्रयोग झाला नाही. मात्र रविवारी व सोमवारी ढग नसल्याने तो ठप्प पडला.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पावसाची स्‍थिती..