आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोडाऊनमध्ये शासकीय शिक्का असलेल्या गहू, तांदळाच्या १६४ गोण्या आढळल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन देवगाव रंगारी रस्त्यावरील अनंतपूर शिवारातील एका गोडाऊनमध्ये गव्हाचा साठा असल्याच्या माहितीवरून १६४ गोण्या गहू व दहा किलो तांदूळ तहसीलदारांच्या पाहणीत आढळून आल्याने सोमवारी गोडावून सील करण्यात आले.  हे धान्य रेशनचे आहे का? याची खात्री करण्यासाठी पुरवठा विभागाने गव्हाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी दिली.
 
सोमवारी सकाळी सात वाजता तहसील प्रशासनास दूरध्वनीवरून लासूर स्टेशन येथील संदीप गायकवाड, अजित जाधव यांनी माहिती दिली.  त्यावरून तहसीलदार डॉ.  शेळके, पुरवठा विभागाचे नायब तहसीदार सीताराम ठोंबरे, मंडळधिकारी रीता पुरी, तलाठी राहुल वंजारी व शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि सूर्यकांत कोकणे, फौजदार प्रशांत मुंढे यांनी घटनास्थळी येऊन  गोडावूनमध्ये असलेले १६४  गव्हाचे कट्टे, दहा किलो तांदूळ तहसीलदारांच्या पाहणीत आढळून आले.
 
त्यामुळे पंचा समक्ष पंचनामा करून गव्हाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेकडे पाठवण्यात आल्यानंतरच हा माल कशाचा आहे हे सिद्ध होणार असल्याचे तहसीलदार  शेळके यांनी स्पष्ट केले.
 
पंकज ठोळे यांनी साठविलेल्या गव्हाच्या १६४ गव्हाच्या गोण्या, दहा किलो तांदूळ व शासकीय शिक्का असलेल्या ५३ रिकाम्या गोण्या मिळून आल्या. केलेल्या पाहणीत प्रथम दर्शनी हा व्यवहार संशयास्पद वाटत असल्याने तहसीलदार शेळके यांनी गोडावून सील केले.  रात्री उशिरापर्यंत नायब तहसीदार सीताराम ठोंबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
 
बातम्या आणखी आहेत...