आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Thampers At Aurangabad Mumbai To Aurangabad On Bullet

वार्‍याशी स्पर्धेची हौस; मुंबईचे ‘थॅम्पर्स’ औरंगाबादच्या सफरीवर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘आज कुछ तुफानी करते है.!’ असे म्हणत जाहिरातीतील तरुण जेव्हा हजारो फूट उंचीवरून उडी मारतो तेव्हा अंगावर शहारे उभे राहतात. असाच काहीसा अनुभव ‘थॅम्पर्स’ या बुलेटप्रेमी गँगकडे पाहिल्यानंतर येतो. 500 सीसीच्या 15 बुलेट घेऊन 15 तरुण आणि 2 तरुणींनी नुकतीच मुंबई ते खुलताबाद अशी वार्‍याच्या वेगाशी स्पर्धा करत साहसी सफर केली.

या बुलेट गँगचे वैशिष्ट्य म्हणजे यात महाविद्यालयीन तरुण, इंजिनिअर, डॉक्टर, उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, कॉर्पोरेट जगतातील तरुणांचा समावेश आहे. या शनिवारी (2 फेब्रुवारी) ‘थॅम्पर्स ग्रुप’ शिर्डीमागे सुमारे 400 कि.मी.चा प्रवास करत हिरण्य रिसॉर्टमध्ये दाखल झाला. केवळ प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून मुंबईतील हा ग्रुप महिन्यातील एखाद्या शनिवार, रविवारी बुलेटवर निघतो. 500 सीसीचे क्लासिक बुलेटचे मॉडेल हाती असताना मुंबईमध्ये ताशी चाळीस आणि पन्नासच्या स्पीडने गाडी चालवावी लागते. त्यामुळे सुसाट बायकिंगचा आनंद घेण्यासाठी हा ग्रुप दूरच्या स्पॉटची निवड करतो आणि थरार वेगाचा अनुभव घेतो. ‘थम्पर्स’ या शब्दाचा अर्थ संगीतातील नादमाधुर्याचा आनंद घेणे. हेच नादमाधुर्य हा ग्रुप बुलेटच्या सायलेन्सरमधून निघणार्‍या ‘ढग्..ढग्..ढग्’ या आवाजात शोधत असतो. महाराष्ट्रातील सर्व बुलेटप्रेमींना एकत्र घेऊन मोठी राइड आयोजित करण्याचा ग्रुपचा ध्यास आहे. रटाळ जीवनात काहीतरी नावीन्य आणण्यासाठी असा उपक्रम महिन्यातून एकदा करणे आवश्यक आहे, असे हिरण्य रिसॉर्टच्या मेधा आठले यांनी सांगितले.

बुलेट गँगचे नियम असे
काय म्हणतात रायडर्स
> गाडी उत्तम चालवता यावी
> परवाना व वाहतुकीचे नियम पाळणे महत्त्वाचे
> हेल्मेट, हँडग्लोव्हज, जाकीट आवश्यक
> ताफ्यासमोर सीनियर लिडिंग रायडर, तर दुसरा अनुभवी रायडर सर्वात मागे असतो
> टूरच्या काळात हायवेवरील अपघाताकडे हा ग्रुप कानाडोळा करत नाही.
> जखमींना शक्य ती मदत केली जाते
> एका टूरसाठी प्रत्येकी पाच ते दहा हजारांचा खर्च

>दैनंदिन जीवनातील तोचतोपणा टाळण्यासाठी आम्ही आवर्जून रायडिंग करतो. या माध्यमातून नवनवीन मित्र भेटतात.
- मंदार नाईक, सॉफ्टवेअर इंजिनिअर.

>रायडिंगला कधी निघायचे याची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. दर महिन्याच्या शेवटच्या वीकएंडला आम्ही ट्रीप काढतोच.
- डॉ. ललित रमीना.

>प्रत्येक ट्रीपला एक सामाजिक हेतू असतो. ज्या भागात जातो त्या भागातील संस्कृती आणि अडचणी जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यातून समाजाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मिळतो.
- श्याम नेमन, बी. कॉम

>या ग्रुपमध्ये राहिल्यामुळे सहकार्याची भावना वाढते. मी गाडी शिकते आहे. मी पिलाइन रायडर आहे.
- प्रिया दास, फॅशन डिझायनर

हौसेला मोल नसते!
महाविद्यालयीन तरुण, इंजिनिअर, डॉक्टर, उच्चपदस्थ शासकीय अधिकारी, कॉर्पोरेट जगतातील तरुणांचा ‘बुलेट गँग’मध्ये समावेश