आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: थॅलेसेमियाग्रस्तांसाठी १७५ रक्तदाते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - थॅलेसेमियाग्रस्त मुलांना दर १५ ते २० दिवसांनी रक्ताची आवश्यकता असते. वेगवेगळ्या दात्यांकडून मिळणाऱ्या रक्तामुळे येणाऱ्या रिअॅक्शनचा सामना या मुलांना करावा लागत होता. यासाठी १७५ रक्तदात्यांची एक स्वतंत्र फळी काम करू लागली अन् थॅलेसेमियाच्या २५ मुलांना दिलासा मिळाला.
शहरातील दत्ताजी भाले रक्तपेढीत सेवाव्रती म्हणून काम करणाऱ्या केदार शिंदे यांना थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या अनेक समस्यांची माहिती कामाच्या निमित्ताने होती. या मुलांना सातत्याने दिले जाणारे रक्त वेगवेगळ्या दात्याकडून आलेले असते. मात्र, या रक्तांतील प्रत्येक गोष्ट मुलांच्या शरीराशी एकरूप होतेच असे नाही. काही वेळा रक्तातील बारीक सारीक बाबींमुळे रिअॅक्शन येते. हाच प्रश्न जोशींना भेडसावत होता. तेव्हा त्यांनी काही दात्यांशी चर्चा केली. सातत्याने रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणाऱ्या या दात्यांनी लगेचच याकामी सहमती दर्शवली. सध्या या रक्तपेढीत १२० हून अधिक थॅलेसेमियाग्रस्त रक्तसंक्रमणासाठी येतात. यातील निवडक २५ मुलांना काही दात्यांचे रक्त देण्यात आले. रिअॅक्शन झाली नाही, म्हणून या दात्यांना मुलांसाठी राखीव करण्यात आले. सध्या या साखळीत १७५ दाते जोडले गेले. चार महिन्यांतून एकदा एक दाता त्या विशिष्ट मुलांसाठी रक्तदान करतो. यातून मुलांना तर दिलासा मिळाला, तर दात्यांनाही सत्कर्माचा आनंद मिळत आहे.

सामाजिक जाणिवेने दिली प्रेरणा
जोशींच्या ओळखीत किंवा नातेवाइकांना कुणालाही थॅलेसिमिया झालेला नाही. मात्र, सामाजिक जाणिवेतून ही मिळाली. दात्यांशी चर्चा करून त्यांनी थॅलेसेमियाग्रस्तांसाठीचा गट तयार केला.
पूर्वी मला वेगवेगळ्या दात्यांच्या रक्तामुळे संसर्ग होऊन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ यायची, पण आता ठराविक दात्यांचेच रक्त दिले जात असल्याने काहीच त्रास नाही. समर्थ शिंदे, थॅलेसेमियाग्रस्त