आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटी दुचाकी उभी करणे म्हणजे चोरट्यांना निमंत्रण; अडीच महिन्यांत 176 दुचाकी लांबवल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील अडीच महिन्यांत शहरात दुचाकी चोरीला जाण्याचा उच्चांक झाला आहे. हँडल लॉक तोडून, गर्दीतूनही दुचाकी चोरीला जात असल्याने दुचाकी कशी सुरक्षित ठेवावी, असा मोठा प्रश्न दुचाकीस्वारांसमोर निर्माण झाला आहे. अडीच महिन्यांत जवळपास १७६ पेक्षा अधिक दुचाकी चोरीला गेल्या असून यात बुलेटसह स्पोर्ट‌्स बाइकचाही समावेश आहे. २८ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाला किमान दोन दुचाकी चोरीला जात आहेत. 
 
यात सर्वाधिक प्रमाण एमआयडीसी वाळूज, क्रांती चौक, सिडको, मुकुंदवाडी पोलिस ठाणे हद्दीत आहे. विरळ वस्ती, एमआयडीसीसोबतच आठवडी बाजारांमधून दुचाकी चोरीला गेल्या. जानेवारीत सिडकाे पोलिस ठाणे मुकुंदवाडी ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले. दुसरीकडे पोलिसांना चोऱ्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होत नाहीये. पोलिस आयुक्तांनी विशेष पथकांची स्थापना करूनही दुचाकी चोरीच्या घटना नियंत्रणात आणणे अशक्य होऊन बसले आहे. 
 
याठिकाणी आहे धोका 
{ एमआयडीसीमधील निर्मनुष्यरस्ते, आठवडी बाजार, नॉन पार्किंगमध्ये एकटी उभी असलेली दुचाकी, सुरक्षा रक्षक नसलेल्या बँका, एटीएमचे पार्किंग. 

सहज तुटते दुचाकीचे हँडल लॉक 
{ दुचाकीवर बसूनहँडलच्या टोकाला पायाने विशिष्ट अँगलमध्ये अलगद झटका देताच हँडल लॉकचा जोड तुटते. त्यानंतर काही अंतरापर्यंत दुचाकी ढकलत नेऊन पुढे इग्निशनच्या वायर जोडून दुचाकी सुरू केली जाते. 
 
- काही घटनांमध्ये हेडलाईटच्या भागातून हात घालून वायर स्पार्क करत चावीशिवाय दुचाकी सुरू केली जाते. 
-वेगवेगळ्या बनावट चाव्यांच्या माध्यमातून दुचाकीचे लॉक उघडले जाते. यासाठी जुन्या गाड्यांची निवड केली जाते. चाेरांकडे पंधरा ते वीस चाव्यांचा संच असतो. 

जुन्यागाड्यांना प्राधान्य : दुचाकीचोर जुन्या गाड्यांना प्राधान्य देतात. नवीन दुचाकीचे हँडल लॉक सहजासहजी तुटत नाही. जुन्या दुचाकीचे हँडल घासले गेल्याने आणि लाॅकमधील थ्रेड झिजल्याने त्यात बनावट चावी जाऊन हँडल अनलॉक करता येते. त्यामुळे तीन ते पाच वर्षे जुनी दुचाकी तुलनेने जास्त चोरीला जातात. यात मोपेड चोरीचे प्रमाण अत्यल्प कमी असून हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. फेब्रुवारीत जड वजनाच्या तसेच स्पोर्ट्स प्रकारातील दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाणही वाढले होते. 
 
एक्स्टर्नललॉक गरजेचे :
{ यूलॉक 
{चेनलॉक (५ ते इंच किंवा त्यापेक्षा अधिक इंचाची साखळी ) 
{ फोल्डिंगलॉक
{ केबललॉक
{ दुचाकीच्यालॉकसोबतच बाहेरून लॉक करण्यासाठी बाजारात विविध प्रकाराचे लॉक उपलब्ध आहेत. जाड धातूचे लॉक तोडण्यासाठी चोरांना कष्ट घ्यावे लागतात. काही लॉक ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरही उपलब्ध आहेत.
{ दुचाकीलापेट्रोल लॉक असल्यास थोड्या अंंतरानंतर पेट्रोलचा पुरवठा होत नाही. 
 
दुचाकी चोरांसाठी सोयीची ठिकाणे 
{ निर्मनुष्य ठिकाणावरून दुचाकी सर्वाधिक प्रमाणात चोरीला जातात. 
{ वर्दळीच्या ठिकाणी पण आजूबाजूला दुचाकी उभी नसल्यास ती चोरणे सोपे जाते. 
{ कुंपण नसलेल्या घरासमोरून मध्यरात्री दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. {सुरक्षा रक्षक प्रवेशद्वार बंद करत नसलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी सहजरीत्या चोरली जाते. 
 
इतर वाहनेही चोरीला 
गेल्या पंधरा दिवसांत चार बुलेट आणि स्पोर्ट‌्स बाइक तसेच अडीच महिन्यांत तीन रिक्षा पाचपेक्षा अधिक महागड्या सायकली, एक हायवा एक क्रेनही चाेरीला गेली. 
 
ठाणेनिहाय आकडेवारी 
एमआयडीसी वाळूज - २८, वाळूज - ६, क्रांती चौक -३१, छावणी - ५, बेगमपुरा -६, उस्मानपुरा - ४, जिन्सी - ५, 
सिटी चौक -२ जवाहरनगर- १२, मुकुंदवाडी - २५, सिडको - २९, हर्सूल - ४, एमआयडीसी सिडको -६ , दौलताबाद -१, सातारा - 
 
दुचाकी चोरीची आकडेवारी 
मार्च (१ ते ११ मार्च) - ४० 
फेब्रुवारी- ५३ 
जानेवारी- ८४ 
 
अशी सांभाळा आपली दुचाकी 
{गॅरेजमालक, तज्ज्ञतसेच मेकॅनिकल अभियंत्यांच्या मते दुचाकी चोरी रोखणे अवघड असले तरी काळजी मात्र घेता येते. 
{जेथेजास्त दुचाकी उभ्या आहेत तेथेच दुचाकी लावा. 
{निर्मनुष्यठिकाणी, रस्त्यावर, झाडाखाली दुचाकी उभी करू नका. 
{अपार्टमेंटच्यापार्किंगमध्येदुचाकी मोकळी उभी करू नका. एकाच रांगेत जवळ जवळ दुचाकी उभी करून शेवटची दुचाकी चारचाकी किंवा भिंतीच्या आडोशाला उभी केल्यास चोरांना खटाटोप करणे अवघड जाते. 
{जुन्यादुचाकीचे लॉक झिजल्याने त्या दुसऱ्या चाव्यांनी सुरू होण्याची शक्यता असते. त्यामुळे नवे हँडल लॉक बसवावे. 
बातम्या आणखी आहेत...