आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीचा बख्खळ मोबदला; औरंगाबादच्या शेतकऱ्याला 12 एकरांचे मिळाले 18.50 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- समृद्धी महामार्गात जमीन जाणाऱ्या जयपूर (ता. औरंगाबाद) येथील एका शेतकऱ्यास १८ कोटी रुपयांचा मोबदला देऊन मालामाल केले आहे. समृद्धी महामार्गात जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बख्खळ मोबदला मिळत असल्याने जमिनी देण्यास शेतकरी स्वत:हून पुढे येत आहेत. 


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट औरंगाबाद तालुक्यातून जात आहे. या महामार्गात औरंगाबादपासून ३५ करमाडच्या उत्तरेस १० किमी असलेल्या जयपूर गावातील ६४ शेतकऱ्यांची ४१ हेक्टर ९६ आर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित होत आहे. या गावातील २७ शेतकऱ्यांनी स्वखुशीने आतापर्यंत शासनास जमिनी दिलेल्या आहेत. यापैकी भगवान सर्जेराव मते (४४) या शेतकऱ्याची १२ एकर २० गुंठे जमीन या ड्रीम प्रोजेक्टमध्ये संपादित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्याची जमीन बागायत असल्यामुळे एकरी ५८ लाख रुपये भाव दिला. या शेतात शेतकऱ्यांची ३४०० डाळिंब, ४३ आंबे, चिंच, जांभूळ, पेरूची झाडे होती. तसेच विहिरी, एक पॉलिहाऊस १७५ बाय ३० फुटांचे सिमेंट काँक्रीट घर, जनावरांसाठी लोखंडी पत्र्याचा शेड एवढा बारदाना या महामार्गासाठी संपादित करण्यात आला आहे. या सर्वाचे भगवान मते या शेतकऱ्यास गुरुवारी दि. १५ रोजी १८ कोटी ५० लाख रुपये रोख दिले आहेत. येत्या १५ दिवसांत तांत्रिक बाबी पूर्ण होताच उर्वरित शेतकरी आपल्या जमिनी स्वखुशीने समृद्धी महामार्गासाठी देणार आहेत. 


जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतर भगवान मते (दिव्य मराठी)शी बोलताना म्हणाले की, माझी गावातच अजून २३ एकर जमीन शिल्लक आहे. तसेच औरंगपूर येथे ९, वडीगोद्री दुधड येथे एकर जमीन घेऊन ठेवली आहे. आजही माझ्याकडे ४८ एकर जमीन शिल्लक आहे. आम्ही दोन भाऊ आहोत. परंतु आमचे गाव मुख्य रस्त्यापासून दूर असल्याने तसेच कुणाचे मार्गदर्शन मिळाल्याने आमचे शिक्षण होऊ शकले नाही.

 
नातवांना देणार उच्च शिक्षण 
शेतीतीलमजुरी गगनाला भिडली असून शेतमालालाही म्हणावा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे नातवांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार आम्ही दोघा भावांनी केला आहे. आता पैसे आलेले आहेत. घरात सर्व कुटुंब एकत्र बसू वर्षभरानंतर कुठला व्यवसाय निवडायचा याचा विचार करू. तूर्त सर्व पैसे आम्ही ठेवीरूपात बँकेत ठेवणार आहोत. 

बातम्या आणखी आहेत...