आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी विरोध, आता सुटीच्या दिवशीही समृद्धीच्या 18 रजिस्ट्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सुटीच्या दिवशी रविवारी समृद्धी महामार्गाच्या तब्बल १८ रजिस्ट्री झाल्या. जवळपास हेक्टर जमिनीचे संपादन झाल्याची माहिती तहसीलदार सतीश सोनी यांनी दिली. 


रविवारी फेरण जळगावच्या १३ शेतकऱ्यांनी ३.३८ हेक्टर जमीन समृद्धीला दिली. यामध्ये कौशाबाई गवळी, तुकाराम भोसले, रमेश घावरे, भाऊसाहेब कोरडे, नरहरी भोसले, रमेश घावरे, अर्जुन गवळी, सारंगधर गवळी, बबन गवळी, शिवराम वाघ, रावसाहेब गवळी या शेतकऱ्यांचा समावेश आहे. 


माळीवाड्याच्या दोन शेतकऱ्यांनी दिल्या जमीन
माळीवाड्यामध्ये जमीन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. मात्र रविवारी दोन शेतकऱ्यांची एक हेक्टर आठ गुंठे जमीन संपादित करण्यात आली. गोरखनाथ मुळे, शंकर लालाजी हेकडे यांची १.८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. जयपूरच्या उमेश मते, भिकापूरच्या शेख मसूर शेख अमीर आणि कैलास खोतकर यांनी जमिनी दिल्या. 


प्रशासनाने साधला संवाद
माझ्या ९१ गुंठे जमिनीला दोन कोटी ५७ लाख रुपये इतकी रक्कम मिळाली. बागायती जमीन असल्यामुळे चांगला भाव मिळाला आहे. प्रशासनाने संवाद साधल्यामुळे आमचे समाधान झाले आहे, असे शेतकरी नरहरी भोसले यांनी सांगितले. मी १५ गुंठे जमीन समृद्धीसाठी दिली असून ३३ लाख रुपये रक्कम मिळाल्याची माहिती भाऊसाहेब गवळी या शेतकऱ्याने दिली. 

बातम्या आणखी आहेत...