आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूरच्या विद्यार्थ्याची कन्नडला गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- येथील विनायकराव पाटील पॉलिटेक्निक महाविद्यालयातील मेकॅनिकलच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या राहुल देविदास बेलेकर या १८ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

राहुल बेलेकर हा वैजापूर तालुक्यातील लाखनी मांडकी येथील रहिवासी असून तो शिक्षणासाठी कन्नड शहरातील दत्त कॉलनीमध्ये मित्रासह खोली भाड्याने घेऊन राहत होता. पोळ्यानिमित्त तो गावाकडे जाऊन शुक्रवारी परत आला होता. त्याचा रूम पार्टनर दुपारी रूमवर आला. त्याने आवाज दिला, दरवाजा वाजवला, मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळाल्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यास राहुलने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. त्याने त्वरित घरमालकास माहिती देत कन्नड पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रूमची तपासणी केली असता तेथे चिठ्ठी सापडली. त्यात मी जे काही केले त्यास कुणालाही जबाबदार धरू नये. आत्महत्येस मी स्वत: जबाबदार आहे. तर रूम पार्टनरचे म्हणणे असे आहे की अभ्यास अवघड जात असल्याची राहुलची ओरड होती. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे, पोलिस नाईक कैलास निंभोरकर, पो. कॉ. सलीम शहा यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक फौजदार अशोक तुपे हे करीत आहेत.
पिशोर येथे युवकाची शेतात आत्महत्या
पिशोर- येथील डिगर भागातील २२ वर्षीय तरुणाने शफियाबाद शिवारातील गट नं. ३२० येथील शेतात सागाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उशिरा उघडकीस आली.

गोकुळ अशोक नवले (रा. डिगर, पिशोर ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. ज्ञानेश्वर नवले यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पिशोर पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...