आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातून एकाच वेळी १९ किलो गांजा जप्त, जिन्सी, हर्सूल, बेगमपुऱ्यात सापडला गांजाचा साठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात मोठ्या प्रमाणावर नशेच्या पदार्थांची तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शनिवारी रात्री वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी शहर पोलिसांनी छापा टाकत १९ किलो गांजा जप्त केला. जिन्सीतून १६ किलो ३०० ग्रॅम, हर्सूल परिसरातून किलो ७०० ग्रॅम, तर बेगमपुरा भागातून ६२३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सुरेश शिवाप्पा शेटे (३५, रा. जयभवानीनगर ) हे शहरातील मुख्य सप्लायर असून एकाच कुटुंबातील काही व्यक्ती या गांजाची विक्री करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
शहरातील तरुण पिढी ही व्यसनाधीन होत असून नशेच्या आहारी गेल्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे आमदार इम्तियाज जलील इतर लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी समोर आणले होते. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या रिकाम्या जागा, उद्यानात तरुण खुलेआम गांजाचे सेवन करताना आढळून येत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गुन्हे शाखेचे एक पथक या गांजा विक्रेत्यांवर पाळत ठेवून होते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, ज्ञानेश्वर साबळे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी कौठाळे, उन्मेष थिटे, गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक बागूल स्थानिक पोलिस ठाण्याचे अधिकारी यांच्या पथकाने हर्सूल, जिन्सी आणि बेगमपुरा या तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापा टाकत गांजाचा साठा जप्त केला. याची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त खुशालचंद बाहेती, उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी एक महिला आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात पोलिसांनी कारवाईची तयारी सुरू करताच गांजा विक्रेत्यांना त्याची माहिती मिळत असे. एका ठिकाणी छापा टाकल्यास दुसऱ्या ठिकाणावरील माल काही क्षणात गायब होत असे. त्यामुळे कारवाई करणे अवघड जात होते. पोलिसांनी काही दिवस खबऱ्यामार्फत या लोकांवर लक्ष ठेवले एकाच वेळी तीन ठिकाणी कारवाई करत लाखो रुपयांचा गांजा जप्त केला.
बातम्या आणखी आहेत...