आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात १९ मिमी पावसाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मृग नक्षत्रात दररोज पाऊस पडत आहे. सोमवारी १९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आठ दिवसांपासून सरीवर सरी कोसळत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
नदी, नाले ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. जलपुनर्भरणाच्या कामालाही वेग आला आहे. एकाच आठवड्यात १४७ मिमी पाऊस पडण्याचा विक्रम झाला असून तशी नोंदही चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. संततधार पाऊस पडत असल्याने सखल भागात तळी साचली आहेत.