आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Thousand Purchasing Through Credit Card Code Hacking

क्रेडिट कार्डचा कोड हॅक करून 19 हजारांची खेरदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मॅट्स कंपनीतील कामगार संतोष काळेश्वर (43) यांच्या क्रेडिट कार्डचा सस्पेन्स कोड हॅक करून भामट्याने 19 हजार 574 रुपयांची खरेदी केल्याची घटना उघडकीस आली आहे.

कोळेश्वर यांनी 18 मार्चला क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन मोबाइल रिचार्ज केला होता. याच दरम्यान त्यांच्या कार्डचा सस्पेन्स कोड हॅक करण्यात आला. सायंकाळी 6 वाजून 26 मिनिटांनी त्यांच्या मोबाइलवर क्रेडिट कार्डद्वारे 19 हजार 574 रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचा मेसेज आला. यानंतर त्यांनी सिडकोच्या अँक्सिस बँकेत धाव घेतली. तेव्हा बँकेने क्रेडिट कार्डवरून वळती करण्यात आलेली रक्कम 5 एप्रिलपर्यंत बँकेत जमा करण्याची ताकीद दिली आहे, तर आपली फसवणूक झाल्याची तक्रार कोळेश्वर यांनी उस्मानपुरा पोलिसांकडे केली आहे. यापूर्वी 15 आणि 16 डिसेंबर 2012 रोजी दोघांची अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती.