आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात 1998 ग्रामपंचायतींकडून रोहयोवर छदामही खर्च नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्र सरकारने  अर्थसंकल्पात मनरेगाच्या कामाच्या निधीत भरघोस वाढ केली आहे. मात्र, मराठवाड्यात रोहयोच्या कामांबाबत ग्रामपंचायतीची उदासीनता दिसून येत असून २०१६-१७ मध्ये ६६४३ पैकी तब्बल १९९८ ग्रामपंचायतींनी या कामांवर छदामही खर्च केला नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या कामांवर मराठवाड्यात वर्षभरात  ४५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पैसा उपलब्ध असूनही अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष  आणि ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे रोहयोची कामे होत नसल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील  ८६१ पैकी ३३३ ग्रामपंचायतींनी एप्रिल २०१६ ते फेब्रुवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत  वर्षभरात एक रुपयाही खर्च केलेला नाही. यात शून्य टक्के खर्च झालेल्यांमध्ये औरंगाबाद, कन्ऩड, वैजापूर आणि पैठण तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात वर्षभरात ३३ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाले. 
 
वर्षभरात ४५८ कोटी रुपये  खर्च: मनरेगावर २०१५-१६ मध्ये ४९९ कोटी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. या वर्षी ४५८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून मार्चअखेरपर्यंत ७०० कोटी खर्चाचे नियोजन आहे. मराठवाड्यात अकुशलवर २८२ कोटी तर १४९ कोटी रुपये कुशल कामावर खर्च झाले.  यात  जालना ४४ कोटी ३२ लाख , परभणी ८५ कोटी ८८ लाख, बीड १०५ कोटी, लातूर ७६ कोटी ६६ लाख, हिंगोली २९ कोटी १२ लाख,  उस्मानाबाद ४६ कोटी ४० लाख  रुपये खर्च करण्यात आले. मराठवाड्यात २०१६-१७ मध्ये ११५०० सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून ८५१८ सिंचन विहिरी पूर्ण केल्या आहेत. 
 
निवडणुकीनंतर जिल्हास्तरीय आढावा घेणार     
रोहयोच्या माध्यमातून अनेक कामे करता येणे शक्य आहे. याबाबत मनरेगाच्या कामांचा जिल्हास्तरीय आढावा घेतला जाईल. ज्या ग्रामपंचायतींनी पैसा खर्च केला नाही, त्याचाही आढावा घेण्याबरोबरच जनजागृती करण्यात येणार आहे - डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त, औरंगाबाद.
 
शासन आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत    
या कामांसाठी ग्रामपंचायतीनेदेखील पुढाकार घेतला पाहिजे. तालुका पातळीवर तहसीलदारांनीदेखील आढावा घेतला पाहिजे. निधी उपलब्ध होऊनही तो खर्च होत नसेल तर त्याला शासन जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्षदेखील याला कारणीभूत आहे. - सुभाष लोमटे, अध्यक्ष, मराठवाडा लेबर युनियन.
 
जिल्हा    एकूण    0 % (ग्रा.पं.)   टक्केवारी
                         
औरंगाबाद    ८६१    ३३३    १६.१०      
जालना    ७७९    २८५    ३५.४९      
परभणी    ७०४    १३४    १८.५१     
बीड    १०२३    २९५    २४.४६     
लातूर    ७८३    १२७    १६.१०     
उस्मानाबाद    ६२१    १०९    १६.४४     
नांदेड    १३०९    ४७१    ३५.८२     
हिंगोली    ५६३    २४४    ४२.८८  
बातम्या आणखी आहेत...