आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2.5 लाख गॅस ग्राहक ‘निराधार’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-एक फेब्रुवारीपासून गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यावर जमा होणार आहे. याचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचे बँक खात्याशी संलग्नीकरण करणे गरजेचे आहे; परंतु शहरातील 3 लाख 28 हजार 975 जणांपैकी अडीच लाख गॅस ग्राहकांनी अद्याप ‘आधार’चे संलग्नीकरण केले नसल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांत संलग्नीकरण केले नाही, तर सध्याच्या बाजारभावाप्रमाणे म्हणजेच 1,321 रुपयांना गॅस सिलिंडर घ्यावे लागणार आहे.
दुसरी तांत्रिक अडचण अशी की, ज्या गॅस ग्राहकांनी नोंदणी करूनही कित्येक महिन्यांनंतरही आधार कार्ड मिळाले नाहीत, त्यांनाही केवळ शासनाच्या लालफीतशाहीमुळे विनाअनुदानित सिलिंडरचेच पैसे द्यावे लागणार आहेत. अशा ग्राहकांची संख्या सुमारे 20 हजार एवढी आहे. र्मयादित कालावधीत सर्वांची ‘आधार’ नोंदणी करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले होते; परंतु प्रशासन आणि ‘आधार’ पुरवणार्‍या एजन्सीला हे उद्दिष्ट गाठता आले नाही. परिणामी, याचा फटका सामान्यांना बसत आहे. शहरातील तीन लाख 28 हजार 957 ग्राहकांपैकी केवळ 76 हजार 775 ग्राहकांनीच ‘आधार’चे बँकेशी संलग्नीकरण केले आहे. तसेच ग्रामीण भागातील एक लाख 81 हजार 818 ग्राहकांपैकी केवळ 53 हजार 398 ग्राहकांनी संलग्नीकरण केले आहे. शहरात एक लाख 40 हजार 190 ग्राहकांनी ‘आधार’ची नोंदणी केली. त्यापैकी 20 हजार ग्राहकांना आधार कार्ड मिळालेले नाहीत. याबाबत प्रशासनाने जबाबदारी झटकली असून कार्ड पोहोचवण्याचे काम बंगळुरू येथील एजन्सीकडे असल्याचे सांगून हात झटकले आहेत. भारत पेट्रोलियम
‘आधार’ नोंदणीला पाच महिने उलटले तरीही कार्ड मिळेना
एजन्सी : 16
ग्राहक : एक लाख 85 हजार 686
‘आधार’ संलग्नीकरण केलेले ग्राहक : 89 हजार 461
‘आधार’चे बँकेशी संलग्नीकरण केलेले ग्राहक : 57 हजार 161
एजन्सी : 13
ग्राहक : एक लाख 30 हजार 835
‘आधार’ संलग्नीकरण केलेले ग्राहक : 64 हजार 306
‘आधार’चे बँकेशी संलग्नीकरण केलेले ग्राहक : 39 हजार 955
एजन्सी : 13
ग्राहक : एक लाख 94 हजार 254
‘आधार’ संलग्नीकरण केलेले ग्राहक : 74 हजार 62
‘आधार’चे बँकेशी संलग्नीकरण केलेले ग्राहक : 33 हजार 57
जिल्ह्यातील स्थिती अशी..
मुदतवाढ दिल्यास दिलासा
‘आधार’ची नोंदणी करूनही कार्ड न मिळणार्‍या ग्राहकांची संख्या जास्त आहे. ग्राहकांनी नोंदणीची प्रत पुरवठा विभागाकडे सादर केल्यास संलग्नीकरणास प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एक महिन्याची जास्तीची मुदतवाढ दिल्यास उर्वरित ग्राहकांचे आधार कार्ड काढून संलग्नीकरणास संधी मिळू शकते.
‘आधार’ काढूनही अडचण
सहा महिन्यांपासून आधार कार्ड काढले आहे. मात्र, अद्याप कार्ड मिळाले नसल्याने मोठी अडचण झाली आहे. विशाल सोरदे, शिवाजीनगर.
अद्याप संलग्नीकरण नाही
आधार कार्ड काढून बँक व एजन्सीला दिले. मात्र, त्याची कोणतीच नोंद घेण्यात आली नाही. मला अनुदानित सिलिंडर केवळ 451 रुपयांत मिळत आहे. शेषराव भालेराव, शिवनेरी कॉलनी.
नोंदणी प्रतवर संलग्नीकरणाचा प्रयत्न
ज्या ग्राहकांना आधार नोंदणी करूनही आधार कार्ड मिळाले नाही, अशा ग्राहकांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधल्यास त्यांचे संलग्नीकरण करण्याचा प्रयत्न करू. संजीव जाधवर, पुरवठा अधिकारी.