आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर: चोरटी दारू विक्री करणाऱ्यांना पकडले; दोघे फरार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना तालुक्यातील परसोडा येथे १३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेला घडल्या. यातील अन्य दोघे मात्र फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पकडलेल्यांकडून पोलिसांनी मोटारसायकलसह २४० देशी दारूच्या बाटल्या असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.   

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परसोडा शिवारातील रेल्वे पुलाजवळ मोटारसायकलवरून (एमएच २० ईसी ०१८८) जाणाऱ्या नाना जाधव व सूरज काकडे यांच्याकडे पोलिसांना ९६ दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना थांबवल्यावर काकडे तेथून फरार झाला. पोलिसांनी जाधव याच्याकडून मोटारसायकलसह २४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला. तर  दुसऱ्या एका घटनेत याच पुलाच्या परिसरात एका विनाक्रमांकाच्या मोटारसायकलवरील रेवणनाथ शेटे व ज्ञानेश्वर नाईकवाडी यांना पोलिसांनी अडवले. त्यांची झडती घेत असतानाच शेटे हा तेथून फरार झाला.   

पोलिसांनी नाईकवाडी याच्या ताब्यातून १४४ बाटल्या जप्त केल्या. फौजदार संजय खिल्लारे, सहायक फौजदार नारायण कटकुरी, बाबासाहेब जऱ्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. 
बातम्या आणखी आहेत...