आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत एकनाथ रंगमंदिरासाठी 2 कोटींची घोषणा; रंगकर्मी म्हणतात, भरोसा नाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गेल्या चार वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत दोन कोटी रुपये देण्याची घोषणा खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंगळवारी केली. मात्र, यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता राजकारणी, प्रशासनावर भरवसा नसल्याचे स्थानिक रंगकर्मींनी सांगितले. 
 
दीड वर्षापूर्वी प्रख्यात अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी रंगमंदिराचे बकालपण अस्वस्थ करणारे असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यानंतर अभिनेता प्रशांत दामले यांनीही येथे तत्काळ दुरुस्तीची सूचना केली होती. त्याची दखल घेऊन स्थानिक रंगकर्मींनी मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. तेव्हा वाटेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ. रंगमंदिराचे रूप पालटू, असे आश्वासन मिळाले. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. त्यामुळे आता खैरे, आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून घोषणा केली असली तरी ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता नसल्याचे रंगकर्मींनी नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. 

तीन दिवसांपूर्वी प्रख्यात अभिनेते सुमीत राघवन यांनी फेसबुकवर रंगमंदिराच्या दुरवस्थेचा व्हिडिओ टाकला. दुरवस्थेसाठी त्यांनी शिवसेनेवर ठपका ठेवला. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आमदार शिरसाट यांनी २० लाखांचा आमदार निधी घोषित केला. याची माहिती मिळताच खासदार खैरे यांनी मंगळवारी रंगमंदिराची पाहणी करून पालकमंत्री रामदास कदम यांच्याशी चर्चा केली आणि डीपीसीमधून दोन कोटी देऊ, अशी घोषणा केली. 
 
निधी मिळण्यास तीन आठवडे, मगच निविदा प्रक्रिया 
डीपीडीसीचाहा निधी मनपाकडे येण्यास किमान तीन आठवडे लागतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष काम होण्यास चार महिने तरी लागतील. सत्ताधारी तसेच अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन लक्षात घेता घोषणा बारगळण्याचीच शक्यता अधिक आहे, असे रंगकर्मींनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, रंगमंदिरासाठी हरिभाऊ पवार यांना पूर्णवेळ व्यवस्थापक नेमणार अशी माहिती मनपा शहर अभियंता सिकंदर अली यांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...