आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिकल विद्यार्थ्यांना ‘जातवैधते’साठी दाेन अाठवड्यांची मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘नीट’द्वारे प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी सर्वाेच्च न्यायालयाने दिलासा दिला अाहे. सर्व ३५३ विद्यार्थी अनुसूचित जाती, जमाती, भटके  विमुक्त अाणि इतर मागास प्रवर्गातील अाहेत.   
 
महाराष्ट्रामध्ये ३५३ पैकी १३५ विद्यार्थी इतर मागास प्रवर्ग, भटके विमुक्तांचे अाहेत. त्याशिवाय अनुसूचित जातीचे ९९ तर अनुसूचित जमातीचे एकूण ११९ विद्यार्थ्यांनी वैद्यकीय प्रथम वर्षासाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेतला होता. अारक्षित प्रवर्गातील विद्यार्थी असल्यामुळे सर्वांना जातवैधता प्रमाणपत्र १९ अाॅगस्टपर्यंत  सादर करणे गरजेचे होते. मात्र विविध शासकीय कार्यालयाच्या वतीने जातवैधता प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई करण्यात अाली होती. त्यामुळे ३५३ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होण्याची शक्यता होती. सर्वाेच्च न्यायालयाने सामाजिक न्याय व अादिवासी विकास विभागांना दोन अाठवड्यांच्या अात या विद्यार्थ्यांना प्राधान्याने जातवैधता प्रमाणपत्र प्रदान करण्याचे निर्देश दिले अाहेत.  ३५३ विद्यार्थ्यांपैकी औरंगाबादचे १९, जालन्याचे ०७ अाणि नांदेड येथील ३६ विद्यार्थी अाहेत. अॅड. सुनील विभुते अाणि अॅड. अब्दुल कय्युम तडवी यांनी सर्वाेच्च न्यायालयात बाजू मांडली.
बातम्या आणखी आहेत...