आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अपघातांत तरुण, ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुधवारी रात्री झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातांमध्ये एका दुचाकीस्वार तरुणाचा आणि ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. शुभम भाऊसाहेब जगताप (२४) आणि गुलाब खान वजीर खान (६८) अशी मृतांची नावे आहेत. शुभम अमरप्रीत चौकातून यू वळण घेत होता. या वेळी त्याची दुचाकी घसरून तो खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. तर दुसऱ्या घटनेत गुलाब खान यांना जड वाहनाने मागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. या दोघांचाही घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शिवशंकर कॉलनीत राहणारा शुभम भाऊसाहेब जगताप (२४) हा बुधवारी रात्री कामानिमित्त मित्रांकडे गेला होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास तो घराकडे निघाला. रात्री सव्वादहाच्या सुमारास अमरप्रीत चौकातून वळण घेत असताना त्याची दुचाकी (एम एच - २० - डब्ल्यू - ४४७३) घसरली. यात शुभमच्या डोक्याला गंभीर इजा झाली. काहींनी त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. रात्री १२.१५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात नाेंद झाली अाहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. ए. कदम करत आहेत.

केटरिंगच्याव्यवसायाला केली होती सुरुवात : शुभमवडील भावासोबत शिवशंकर कॉलनीत राहत होता. काही वर्षांपूर्वीच त्याने केटरिंगचा व्यवसाय सुरू केला होता. छोठ्या मोठ्या कार्यक्रमांचे कंत्राटही त्याला मिळणे सुरू झाले होते. परिसरातील मित्रांनाही त्याने कामात सहभागी करून घेतले होते. बुधवारी सायंकाळी तो शाळकरी मित्र सचिन सागर यांना भेटण्यासाठी गेला होता. मित्रांनी गुरुवारी पतंग उडवण्याचा बेतही आखला होता. मात्र रात्री ही घटना घडल्याने कुटुंंबीयांसह मित्र परिवारावर शोककळा पसरली.


गुलाबखान (६८, रा. आसेफिया कॉलनी) बुधवारी रात्री नऊला काम आटोपून घरी पायी जात होते. झाल्टा फाटा येथे खोदकामासाठी वापरले जाणारे स्फोटके वाहून नेणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना घाटीत दाखल केले असता रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...