आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डा चुकवताना कारची धडक, दोन तरुण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महिन्याच्या शेवटी मेस, रूमभाडे इतर खर्चासाठी लागणारे पैसे आई-वडिलांकडून घेऊन दुचाकीने शहराकडे परत निघालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सोमवारी मध्यरात्री बिडकीन परिसरातील बंगला तांडा येथे अपघाती मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असतानाच समोरून आलेल्या कारवर त्यांची दुचाकी धडकली. यात दोघेही गंभीर जखमी होऊन गतप्राण झाले. वैभव लक्ष्मण काळे (२५, रा. कुतुबखेडा) आणि अनिल बाबासाहेब ठोंबरे (२०) असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. वैभवचा जागीच तर अनिलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वैभव अनिल दोघेही शहरात शिक्षणासाठी आले होते. महिनाअखेरीस पैसे संपल्याने पैसे आणण्यासाठी सोबतच गावाकडे गेले होते. घरच्यांना भेटून तसेच पैसे घेऊन ते पैठणला आपल्या मित्रांना भेटले. पैठणहून ते शहराकडे येण्यासाठी रात्री निघाले. बंगला तांडा येथे रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच २० एस ५५४९) आली असता खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नाविरुद्ध दिशेने आलेल्या स्विफ्ट कारवर (एमएच २० बी जे १८१७) समोरासमोर धडकली. अपघातानंतर कारचालक पसार झाला. प्रवाशांनी दोघाही जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी वैभवला मृत घोषित केले तर अनिल यास नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले, परंतु उपचार सुरू असताना त्याचाही पहाटे मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांचेही वडील शेती करतात. वैभव हा विवेकानंद महाविद्यालयात तर अनिल हा एमजीएम महाविद्यालयात शिक्षण घेत होता. अपघाताची बिडकीन पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मुख्य हवालदार अनिल पवार पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...