आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्नडजवळ अपघात; दोन व्यापारी, 50 बकऱ्या ठार, 4 जण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड- कन्नडजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास धुळ्याहून निजामाबादकडे बकऱ्या विक्रीसाठी वाहून नेणारी पिकअप गाडी आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात बकऱ्यांचे दोन व्यापारी अब्दुल अजीज शेख रफिक(२६) शेख राजू शेख रशीद (२४ ,दोघेही राहणार धुळे), ५० बकऱ्या जागीच ठार झाल्या तर जण गंभीर जखमी झाले. सुमारे ५० बकऱ्याही जागीच गतप्राण झाल्या. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्यातील एकच बकरी वाचली आहे.
 
पिकअपमधील अकिल अन्सारी, शेख नफिज शेख रशीद (३०), शेख अरबाज शेख शेख रशीद ट्रकचा क्लिनर बाळू उत्तमराव खरात (३९ ,रा.पाथरी, ता. औरंगाबाद ) हे गंभीर जखमी झाले. जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले. ट्रक चालक अपघात झाल्यावर पळून गेला.
बातम्या आणखी आहेत...