आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतीत 20 दिवस पुरेल इतका भाजीपाला शिल्लक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जूनमध्ये पावसाने दडी मारल्याने शेतमळे कोरडे होत आहेत. सध्या जिल्ह्यातीत शेतमळ्यांत 15 ते 20 दिवस पुरेल एवढाच भाजीपाला शिल्लक आहे. त्यामुळे आणखी 10 दिवस पाऊस न आल्यास भाजीपाल्याच्या किमती 30 टक्के वाढण्याची शक्यता आहे. आगामी दहा दिवसांनंतर पश्चिम महाराष्ट्रातून येणार्‍या भाजीपाल्यावर शहरवासीयांची ‘भाजी’ शिजणार आहे. दोन दिवसांत पाऊस झाल्यास आगामी 10 ते 15 दिवसांत किमती घटण्याची शक्यता आहे.
शहरातील लाखो नागरिकांच्या जेवणातील पदार्थ जिल्ह्यात पिकणार्‍या पालेभाज्यांवर अवलंबून आहेत. पावसाअभावी भाज्यांचे उत्पादन 50 टक्के घटले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाच रुपयांना मिळणारी मेथीची जुडी या आठवड्यात थेट दहा ते पंधरा रुपयांना मिळत आहे. वादळाने शेतीचे नुकसान झाल्याने उत्तर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला मागवावा लागत आहे, तर अद्रक आणि कांदे जिल्ह्यातून बाहेरील जिल्ह्यात पाठवले जात आहेत. त्यामुळे कांदे आणि अद्रकही महागली आहे.

शहरातील बाजार
छावणी, पीरबाजार, जाफरगेट, चिकलठाणा, औरंगपुरा, शहागंज, मुकुंदवाडी, नवजीवन कॉलनी, टीव्ही सेंटर आणि जाधववाडी या प्रमुख मंडयांमधून नागरिक भाजीपाला खरेदी करतात. येथील भाजी विक्रेत्यांची संख्या 3 हजारांवर असून 5 लाख 30 हजार ग्राहक भाजीपाला खरेदी करतात.
बाहेरून भाजीपाल्याची आवक

सध्या बाजारात पत्ता व फुलकोबी, गवार, भेंडी, टोमॅटो, काकडी, मेथी आणि कोथिंबीर अहमदनगर आणि पुणे येथून येत आहे, तर बटाटे उत्तर प्रदेशातून येत असल्याने या भाज्यांचे दर वाढलेले आहेत.

जिल्ह्यात पिकणारा भाजीपाला
गवार, टोमॅटो, मिरची, अद्र्रक, वांगे, दोडका, पालक, मेथी, कोथिंबीर, कांदे जिल्ह्यातच मिळत आहेत. अद्र्रक, मिरची व कांदे मुंबई आणि हैदराबादला पाठवले जातात.

या गावांतून भाज्यांचा पुरवठा
शहराला मांडकी, पोखरी, पिसादेवी, चौका, वाडी कोलठाण, हर्सूल, मोरहिरा, शेंद्रा, झाल्टा, वाळूज, पंढरपूर, अंजनडोह, जटवाडा, ओहर, वरझडी, बनगाव, जयपूर , मांडकी, बनगाव, जयपूर, कुबेर गेवराई, शेंद्रा, वरझडी, वरुड, भालगाव, चौका, हर्सूल, पिसादेवी, जटवाडा आदी गावांतून भाजीपाला येतो.

मेथीला मागणी
सध्या शहरात केवळ वरझडी येथून मेथी येत आहे. येथे 80 एकरावर मेथीची लागवड आहे. दररोज शहरात 10 ते 13 हजार जुड्या विक्रीसाठी येत आहेत. त्याचे दर 15 रुपये आहेत. कुबेर गेवराईमध्ये सध्या 10 एकरांवर गिलके, तर तीन एकरांवर कारले आहेत. 100 एकरांवर टोमॅटो असून केवळ 10 एकरांतीलच टोमॅटो विक्रीसाठी येत आहेत. 20 एकरांमध्ये गवार आहे. नियमित चार ते पाच क्विंटल बाजारात विक्रीसाठी येत आहे.
पावसावरच दाम ठरणार 30 ते 35 टक्के भाववाढ
वेळेवर पाऊस आला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांकडे असलेले भाजीपाला क्षेत्र घटले आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर 30 ते 35 टक्के वाढले आहेत.
एस. एस. गायकवाड, बाजार अधीक्षक

पाऊस न आल्यास दर वाढतील

४ 10 दिवसांत पाऊस न आल्यास मेथीचे दर गगनाला भिडतील. बाहेरून भाजीपाला आयात करावा लागेल.
भारत पठाडे, शेतकरी, वरझडी

पावसावर अवलंबून

४ जयपूर व कुबेर गेवराईत गवार, कोबी, टोमॅटोे यासह कारले, गिलके, भोपळे यांची लागवड केली आहे. मात्र, पावसावर त्याचे अस्तित्व व दाम अवलंबून आहेत.
गणेश कुबेर, शेतकरी, कुबेर गेवराई,

60 टक्के भाजीपाला

४ तालुक्यात 60 टक्के भाजीपाला उपलब्ध आहे. तो टिकवण्यासाठी पावसाची गरज आहे. पाऊस न आल्यास शिल्लक भाजीपाला संपून बाहेरून येणार्‍या भाजीवर अवलंबून राहावे लागेल.
डी. ए. जाधव, कृषी अधिकारी, पं.स.