आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीओएस’ मशीनसाठी २० दिवसांची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटबंदी पूर्वी बँका व्यापाऱ्यांना पीओएस ( POINT OF SALE) वापरा असा लकडा लावत होत्या, मात्र त्याला व्यापाऱ्यांनी फारसे मनावर घेतले नाही. त्याची झळ आता व्यापाऱ्यांना सोसावी लागत आहे. महिनाभरापासून पीओएस मशीनची मागणी वाढली आहे. बँकांकडेही पीओएस मशीनचा तटवडा असल्यामळे एरवी आठवड्याभरात मिळणारे हे मशीन आता २० दिवसांनी मिळत आहे.

तिपटीने वाढला पीओएसचा कालावधी : पीओएसमशीनची मागणी वाढल्यामळे त्याचा वितरणाचा कालावधीही वाढला आहे. याबाबत माहिती देताना एसबीएचचे रमेश भालेराव यांनी सांगितले की, यापूर्वी मेट्रो सिटीसाठी तीन दिवसांत, अर्बनसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागांसाठी दहा दिवसांचा कालावधी होता. मात्र, नोटबंदीमळे या मशीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामळे औरंगाबादसारख्या अर्बन शहरात मशीनचा परवठा करण्यासाठी किमान २० दिवस लागणार आहेत. यामध्ये प्रत्येक बँकेच्या वतीने मख्य कार्यालयाकडे मागणीचे अर्ज पाठवण्यात आले आहेत. एसबीएचची मागणी हैदराबादकडे करण्यात येते. यामध्ये आलेली मागणी त्याच दिवशी स्कॅन करून मेलच्या माध्यमातून मख्य कार्यालयाला कळवली जात आहेत.

अशी करावी पीओएसची मागणी : पीओएसमशीनची मागणी करण्यासाठी व्यापाऱ्याचे संबंधित बँकेत करंट अकाउंट असणे गरजेचे आहे. त्यानंतर बँकेकडून मशीनची मागणी नोंदवण्यासाठी एक फॉर्म भरून द्यावा लागतो. यामध्ये साधारण दोनशे ते सहाशेे रुपये भरून वन टाइम अॅग्रिमेंट करावे लागते. त्यानंतर बँकेच्या वतीने हेड ऑफिसला ती मागणी पाठवल्यानंतर या मशीनची पूर्तता केली जाते. त्यानंतर व्यापाऱ्यांना मशीनसंदर्भात माहिती दिली जाते.

ग्राहकवाढीसाठी मशीनचा फायदा : नोटांचातटवडा असल्यामळे लोक कार्ड स्वाइपचा पर्याय वापरत आहेत. ही मशीन असणाऱ्या दकानांना ग्राहकदेखील पसंती देत आहेत. त्यामळे आपोआपच व्यापाऱ्याच्या व्यवसायातदेखील वाढ होण्यास फायदा होणार आहे. तसेच सरकारलाही या कॅशलेस व्यवहारामळे कराच्या रूपाने वाढीव उत्पन्न मिळण्यासाठी फायदा होणार आहे.

महिनाभरात निर्माण झाले उलटे चित्र : यापूर्वी बँकांच्या वतीने व्यापारी तसेच इतर व्यावसायिकांना या मशीन वापरण्याबाबत विचारणा केली जात होती. मात्र, नोटाबंदीनंतर उलटे चित्र निर्माण झाले आहे. आता व्यापाऱ्यांना बँकेकडे मशीनसाठी विचारणा करावी लागत आहे. मागणी जास्त आणि परवठा कमी यामळे हे चित्र निर्माण झाल्याची माहिती बँकिंग तज्ज्ञ जगदीश भावठाणकर यांनी दिली आहे.

मागणीमळे कालावधी वाढला
बँकेकडे रोज नव्याने पीओएसची मागणी वाढत आहे. मात्र, त्या तलनेत या मशीनची उपलब्धता नाही. त्यामळे व्यापाऱ्यांना परवठा करण्यातही वेळ लागत आहे. अर्बन सिटीमध्ये साधारण वीस दिवस मशीनचा परवठा करण्यासाठी लागणार आहेत. आम्ही मख्य कार्यालयाकडे संपर्क साधत आहोत - रमेशभालेराव, मख्य प्रबंध,एसबीएच.
बातम्या आणखी आहेत...