आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस झाडास धडकली; २० भाविक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन जाणाऱ्या खासगी प्रवासी बसचा स्टिअरिंग रॉड तुटून सोमवारी झालेल्या अपघातात दोन जण गंभीर, तर वीस जण जखमी झाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशवाडी येथील भाविकांना घेऊन उज्जैनकडे जाणाऱ्या बसचा सिल्लोड-अजिंठा रस्त्यावर जुन्या पालोद फाट्यानजीक स्टिअरिंग रॉड तुटला. सोमवारी (दि.१९) सकाळी साडेअकराच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडावर जाऊन ती धडकली. यातील दोन प्रवासी राजू गुंडाबी गंडापाटील (५०) यांच्या डोक्याला मार लागल्याने व सुनील भुपन फुलनामे (४५) फ्रॅक्चर झाल्याने गंभीर जखमी झाले. अन्य वीस प्रवाशांना दुखापत झाली. गणेशवाडी (तालुका शिरोडी, जिल्हा कोल्हापूर) येथील यात्रेकरूंनी रविवारी (दि. १८) वेरूळ येथे घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन मुक्काम केला. यात्रेकरू आज सकाळी (दि.१९) उज्जैन मध्य प्रदेश येथे जाऊन पुढे माउंट अबूला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या बसला पालोद फाट्यानजीक अपघात झाला. जखमींची नावे पुढीलप्रमाणे : अण्णासाहेब कलप्पा गोराडे (५२), रावसाहेब शंकर रोकडे (६५), शिवकुमार गडप्पा बोलवडे(४३), कलप्पा शिवनंदा रेवताळे (४५), बलप्पा शवप्पा अंकलापे (४३), दादा पायगंड (६०), गजानन गिरली गुरताळे (५५), नागराज बिरनाळे (४५), अनिल भागवत (४५), शिवाजी सदाशिव केलेकर (४५), वीरा गुलाप्पा पुजारी (७१) आदी.
बातम्या आणखी आहेत...