आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यात २०० खाटांचे रुग्णालय होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सातारा-देवळाई या नवीन दोन वॉर्डांत सुविधा देण्यासाठी मनपाकडून पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे शासनाने साताऱ्यात २०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी निधी मंजूर केला आहे. रुग्णालयासाठी मनपाला सात एकर जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. तसा प्रस्ताव शनिवारी सर्वसाधारण सभेत येणार आहे.

शासनाच्या आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यानुसार शहरासाठी २०० खाटांचे महिला नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सात एकर जागा उपलब्ध करून देण्याची विनंती जिल्हा शल्य रुग्णालयाने मनपाला केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडूनही मनपाला रुग्णालयासाठी विनंती करण्यात आली होती. शनिवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक ४६४ मध्ये साताऱ्याच्या नगरसेविका सायली जमादार यांनी हा विषय सभेसमोर ठेवला आहे. याला सोहेल शकील अनुमोदक आहेत.