आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतरचे 100 Days: लघुउद्योगांना दरमहा 200 कोटींचा तोटा; 45% उत्पादन ठप्प, 40 हजार बेरोजगार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोटाबंदीला शंभर दिवस होऊन गेले तरीही लघुउद्योगांतील तोटा कमी झालेला नाही. तीन महिन्यांनंतरही तब्बल ४५ टक्के उत्पादन ठप्प आहे. त्यामुळे दरमहा सुमारे २०० कोटी रुपयांचा तोटा त्यांना सहन करावा लागत आहे.
 
गेल्या तीन महिन्यांत ४० हजार कंत्राटी कामगारांचा रोजगार गेला असून सर्वच कारखान्यांनी फक्त आठ तासांची शिफ्ट ठेवत  एक शिफ्ट रद्द केली आहे. यात ऑटोसह फूड, इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक आणि सेवा उद्योगांचा समावेश आहे. नोटाबंदीमुळे झालेला हा परिणाम उद्योग क्षेत्राला तीन वर्षे मागे घेऊन गेल्याचा दावा लघु उद्योजकांनी केला आहे.      
 
आठ नोव्हेंबर ते २० फेब्रुवारी असे ११२ दिवस नोटाबंदीला झाले, तरीही लघुउद्याेगांना बसलेला फटका कमी होण्याची चिन्हे दिसेनाशी झाली आहेत. परिणामी दोन हजार लघुउद्याेजक हवालदिल झाले आहेत. नोटाबंदीला आमचा विरोध नाही, पण जो परिणाम भाेगावा लागत आहे तो दूरगामी आहे, अशा प्रतिक्रिया उद्योजकांच्या आहेत. नोटाबंदीच्या काळात बजाज ऑटो, एंड्युरन्स, व्हेरॉक, ग्रीव्हज कॉटन या उद्योगांनाही फटका बसला आहे. या सर्वच कंपन्यांचे डिसेंबरमध्ये ऑर्डर कमी झाल्याने उत्पादन ५० टक्क्यांनी घटले आहे. बजाज कंपनी शहरात दिवसाला १२०० दुचाकी बनवते, त्या एकदम ६०० वर आल्या आहेत. ग्रीव्हज कंपनी हजार ५०० इंजिन बनवते. नोटाबंदीच्या फटक्याने याही कंपनीचे उत्पादन निम्म्यावर आले आहे. 

औरंगाबादेतील ८० टक्के लघुउद्योग ऑटो सेक्टरवर अवलंबून आहेत. यात मोठ्या उद्योजकांना प्रथम ते तृतीय श्रेणीत समाविष्ट उद्योजक सुट्या भागांचा पुरवठा करतात. त्यातील तृतीय श्रेणीच्या आणि या श्रेणीवर अवलंबून असलेल्या अत्यंत छोट्या उद्योगांना फटका बसला आहे. सीएमआयएचे अध्यक्ष गुरुप्रीतसिंह बग्गा म्हणाले की, बजाजसारखे मोठे उद्योग काही दिवस बंद ठेेवावे लागले, त्याचे परिणाम आता दिसत आहेत. एकूणच मालाचा उठाव ४० ते ४५ टक्क्यांनी कमी झाल्याने हा परिणाम ऑटोसह इलेक्ट्रॉनिक, फूडसह सर्वच सेक्टरवर झाला आहे, तर माजी अध्यक्ष मिलिंद कंक यांनी बग्गा यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. 

तीन वर्षे मागे गेलो       
नोटाबंदीचा निर्णय वाईट नाही, पण त्याच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे लघुउद्योजकांना ४५ टक्के तोटा सहन करावा लागत आहे. कामच नसल्याने सर्वच लघुउद्योजकांनी दोन िशफ्टचे काम एका शिफ्टवर आणले आहे- अर्जुन गायके, लघु उद्योजक, माजी अध्यक्ष, मासिआ. 

दूरगामी परिणाम
तीन महिने लोटले तरीही उद्योगांतील मरगळ कायम आहे. उत्पादनच नसल्याने कर्मचारी कपात व शिफ्टही कमी कराव्या लागल्या. एकूणच महिन्याला २०० कोटींचा फटका बसत आहे - विजय लेकुरवाळे, अध्यक्ष,मासिआ.

पूर्वपदावर येत आहे
बजाज समूहाला डिसेंबरमध्ये ५० टक्के उत्पादन कमी करावे लागले होते, पण आता उत्पादन पूर्वपदावर येत आहे. मागच्या दोन महिन्यांत जो फटका मोठ्या उद्योगांना बसला.
- {कैलास झांजरी, वरिष्ठ उपाध्यक्ष, बजाज ऑटो, पुणे.

कामाचे तास कमी
मोठे उद्योग किंवा मध्यम उद्योगांना जो फटका बसला त्याचा परिणाम छोट्या उद्योगांवर झाला. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला. त्यांची कपात करावी लागली.  
- {उमेश दाशरथी, एमडी, ऋचा इंजिनिअरिंग.  
बातम्या आणखी आहेत...