आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विमानतळासाठी २०० कोटी देऊ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादला आंतराष्ट्रीय विमानतळ करून तेथे जगभराची कनेक्टिव्हिटी जोडण्यात येणार आहे, त्यासाठी राज्य सरकारने दोनशे कोटी मंजूर केले असल्याची माहिती उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबादच्या उद्योजकांना मुंबईत दिली. सीएमआयएचे शिष्टमंडळ मुंबईत देसाई यांना भेटले. शिष्टमंडळात खासदार चंद्राकांत खैरे, सीएमआयएचे अध्यक्ष गुरुप्रीतसिंग बग्गा, उमेश दाशरथी, दुष्यंत पाटील, रितेश शर्मा, अजित मुळे, विनोद नांदापूरकर होते. उद्योगमंत्र्यांनी सांगितले की, एमआयडीसीच्या धोरणांत अामूलाग्र बदल केला आहे. सांडपाणी व्यवस्थापनासह रेनवॉटर हार्वेस्टिंग होणार आहे. डीएमआयसीत औरंगाबादच्या उद्योजकांना प्राधान्याने जागा देऊ जगभरातील उद्योजकांना आकर्षित करताना स्थानिक उद्योजकांना विदेशी दौऱ्यात सामाविष्ट करून घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...